💥पुर्णेतील बुध्द विहारात सामुहिक साप्ताहिक वंदनेला प्रारंभ....!💥शासनाच्या नियमांचे पालन करीत दि.२१ जून पासून  साप्ताहिक वंदनेला सुरूवात करण्यात आली💥

पूर्णा (दि.२१ जुन) - तथागत  भगवान  बुद्धांनी अडीच हजार वर्षांपूर्वीच मानवाच्या उत्तम आरोग्यासाठी स्वछता तसेच शरीराच्या शुद्धते बरोबरच मनाचीही शुद्धता किती महत्वाची आहे हे पटवून दिले आहे असे प्रतिपादन डॉ भदन्त उपगुप्त महाथेरो यांनी व्यक्त केले.असेलॉकडाऊन काळात पूर्ण पणे बंद असलेल्या पूर्णा  येथील  बुध्द विहार येथे शासनाच्या नियमांचे पालन करीत दि.२१ जून पासून  साप्ताहिक वंदनेला सुरूवात करण्यात आली आहे. 


     भदंत डॉ उपगुप्त महाथेरो यांच्या  उपस्थितीत रविवारी सामूहिक वंदनेस सुरुवात करण्यात आली.  रेल्वे कर्मचारी मारोती नाथभजन यांच्या वतीने भिक्खु संघास फळे दान देण्यात आली. या भदंत डॉ उपगुप्त महाथेरो यांनी उपस्थितांना त्रिसरण व पंचशील दिले.
 जागतिक योग दिन व सुर्य ग्रहण असल्याने या विषयावर देखील मार्गदर्शन केले. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व बुध्द विहार समितीचे सर्व पदाधिकारी तसेच भारतीय बौद्ध महासभा तालुका व शहर शाखा पुर्णाचे सर्व पदाधिकारी, सर्व महिला मंडळे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या