💥परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयातील संक्रमीत कक्षात उपचार घेत असलेला एक रूग्ण कोरोनामुक्त....!💥जिल्हा रुग्णालय प्रशासनाने आज शनिवार दि.२० जुन रोजी दिली  कोरोनामुक्त रुग्णास सुट्टी💥

परभणी (दि.२० जुन) - येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील संक्रमीत कक्षात उपचार घेत असलेला एक कोरोना बाधीत रूग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्याला जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या वतीने आज शनिवार री दि.२० जुन रोजी सुट्टी देण्यात आली.सुट्टी देण्यात आलेला कोरोना मुक्त रुग्ण शहरातील सरफराजनगर भागातील आहे. 


जिल्हा शासकीय रुग्णालयात आज शनिवारी संशयितांची संख्या २५६३ झाली आहे.घेण्यात आलेल्या एकूण स्वॅबची संख्या २७५९ झाली असून एकूण २५३७ जणांचे स्वॅब निगेटीव्ह आले आहेत. आज शनिवारी एकही स्वॅब नांदेड येथील प्रयोगशाळेकडे प्रलंबीत नव्हते.आतापर्यंत ८० अनिर्णायक ४७ स्वॅब तपासणीस आवश्यक नसल्याचा अहवाल नांदेड प्रयोगशाळेद्वारे प्राप्त झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९५ रुग्णांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला. ८९ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने  जिल्हा रुग्णालय प्रशासनाने त्या रुग्णांना डिस्चार्ज दिला. आता रुग्णालयात अवघे तीन कोरोनाबाधित रूग्ण उपचार घेत आहेत. त्यांचीही प्रकृती स्थिर आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या