💥वाशिम जिल्ह्यात पुन्हा ७ रुग्नाची भर,जिल्हावाशीयांनो आतातरी खबरदारी घ्या...!



💥सर्वजण कारंजा लाड येथील गांधी नगरातील कोरोना बाधितांच्या नजीकच्या संपर्कातील आहेत💥

वाशिम-(दि. १६ जून २०२०)रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 7 व्यक्तींना कोरोना  विषाणू संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये कारंजा लाड येथील 38 व 48 वर्षीय महिला, 33 व 58 वर्षीय पुरूष व दोन 6 वर्षीय मुली अशा एकूण 6 व्यक्तींचा समावेश आहे. हे सर्वजण कारंजा लाड येथील गांधी नगरातील कोरोना बाधितांच्या नजीकच्या संपर्कातील आहेत.

हिवरा रोहिला (ता. वाशिम) येथील 29 वर्षीय युवक सुद्धा कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. सदर युवक विरार, मुंबई येथून आला असून तेथे कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आला होता. तसेच कोरोना संसर्गाची लक्षणे असल्याने त्याच्या घशातील स्त्राव नमुने तपासणीला पाठविण्यात आले होते.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या