💥अजित न्युज हेडलाईनच्या वृत्ताची दखल...नगर परिषद प्रशासन खडबडून झाले जागे...!💥बसवेश्वर चौकातील अतिक्रमनावर अखेर धडक कार्यवाही,शहरातील सर्वच अतिक्रमण लवकरच उठवणार💥

परभणी/पूर्णा(प्रतिनिधी)शहरातील महात्मा बसवेश्वर चौकात आधीच ट्रॅफिक जाम होत असताना अतिक्रमनाची जोड मिळून शहरातील दस्ती गँग ने नालीचे बांधकाम पूर्ण होताच परत आपले हातपाय पसरत नवीन पत्र्याचे खोके त्याच जागी टाकत पक्के अतिक्रमण करत ह्या चौकातील महत्वाची जागा गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला होता...
परंतु अजित न्युज हेडलाईन ने ह्या प्रकरणी न प चे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी पंकज पाटील व प्रशासनासोबत वारंवार पाठपुरावा केल्याने आज न प   प्रशासनाने थेट कार्यवाही करत तेथील लोखंडी खोके ताब्यात घेत हा परिसर अतिक्रमण मुक्त केला आहे...

जनतेला कायम वाहतुकीसाठी अडचणींचा सामना करावा लागणारा ह्या चौकातील अतिक्रमण हटवून वाहतूक सुरळीत केल्याबद्दल व दस्ती गँग ला धडा शिकवल्याबद्दल कर्तव्यदक्ष मुख्यधिकारी पंकज पाटील आणि टीम न प चे अजित न्युज हेडलाईन तर्फे हार्दिक आभार..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या