💥नांदेड कोविड केअर सेंटर मधील ५ कोरोना बाधीत रुग्ण झाले कोरोनामुक्त,११५ अहवाल येणे बाकी आहेत...!


💥जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या २७५ झाली तर कोरोनाच्या रुग्णांची संख्या झाली ३४९💥
नांदेड (दि.२७ जुन) :- नांदेड मध्ये आज शनिवार दि.२७ जुन रोजी दिवसभराच्या काळात एकही नमुन्यांचा अहवाल प्रयोग शाळेकडून आले नाहीत. मात्र सकाळी पाच जणांना कोविडं केअर सेंटर येथून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
काल शुक्रवा र दि.२६ जुन २०२० रोजी सायंकाळ ते रात्री उशीरापर्यंत १८ अहवाल पॉझिटिव्ह आले तर सकाळी गुलजार बाग येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला. आज शनिवारी दि.२७ जुन रोजी ८६ अहवाल घेण्यात आले,तर २९ पूर्वीचे असे मिळून ११५ अहवाल येणे बाकी आहेत.
कोविड केअर सेंटर येथील ५ रुग्ण बरे झाल्याने कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या २७५ झाली आहे. तर कोरोनाच्या रुग्णांची संख्या ३४९ झाली आहे.१६ जण मरण पावले आहेत.१३५ जण निरीक्षणाखाली आहेत. तर उपचार घेणारे रुग्ण ५८ आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या