💥हिंगोली जिल्ह्यातील जैवविविधता नोंदणीचे काम तात्काळ सुरु करावे - खासदार हेमंत पाटील



💥अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी  महाराष्ट्र जैवविविधता मंडळाकडे केली आहे💥

हिंगोली प्रतिनिधी 

हिंगोली (दि.२६ जुन) - जिल्ह्यातील प्रत्येक गावातील लोकांचे जैवविविधता नोंदवही ( पीबीआर ) तयार करण्याचे काम अद्यापही पूर्ण झाले नसून हे काम तात्काळ सुरु करण्यात यावेत अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी  महाराष्ट्र जैवविविधता मंडळाकडे केली आहे
        हिंगोली लोकसभा मतदार संघातील प्रत्येक गावाचे राष्ट्रीय हरित न्यायालयाने आदेशित करूनही हिंगोली जिल्ह्यातील लोकांचे जैवविविधता नोंदवहीचे अर्थात (पीबीआर) तयार करण्याचे काम अद्यापही प्रशासनाच्या उदासीनतेमुळे रखडलेले आहे  प्रत्येक गावातील लोकांचे  जैवविविधता नोंदवही ( पीबीआर) तयार करून महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाकडे सुपूर्द करण्याचे काम आणि गावातील जैवविविधता जपण्याचे व संवर्धनाची  तरतूद जैवविविधता अधिनियम २००२ नुसार असूनही संबंधित जबाबदारी असणाऱ्या जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांचे या महत्वाच्या कामी दुर्लक्ष होत आहे . राष्ट्रीय हरित न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्यामुळे संबंधितांवर त्वरित कार्यवाही करून हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येक गावातील लोकांचे जैवविविधता नोंदवही ( पीबीआर ) तयार करण्याचे काम त्या प्रत्येक गावात जाऊन गावातील जैवविविधता  समितीसोबत ग्रामसभेत चर्चा करून प्रत्येक गावाचे (पीबीआर) तयार करण्यात यावेत अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी केली असून या कामाची केवळ कागदोपत्री नोंद करून खोटी माहिती देणार्‍या संबंधितावर कारवाई  करण्यात येईल असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले .  पृथ्वीवरील जैवविविधता वातावरणातील बदलामुळे नष्ट होत असून त्यामुळे सजीवांच्या आरोग्यावर परिणाम , मानवास पिण्यायोग्य पाण्याची कमतरता , शेतीच्या उत्पादनामधील  दिवसेंदिवस होणारी घट , अनेक सुक्ष्मजीव आणि प्रजाती नष्ट होत आहेत, जुने आजार नवीन प्रकारात रूपांतरित होऊन समोर येत आहेत. सध्याचा कोरोना सारखा जगात हाहाकार उडविणारा  संसर्गजन्य आजार याचेच उदाहरण आहे. पृथ्वीतलावरील ही जैवविविधता टिकवून ठेवण्याचे काम समस्त मानवजातीचे असून त्यामुळे प्रत्येक गावात असणारी  त्या त्या भागातील पशू पक्षी , निसर्गातील
दुर्मिळ असणाऱ्या सर्वच घटकांची माहिती जैवविविधता नोंदवहीच्या माध्यमातून जमा करून त्यावर काम करता येईल असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या