💥भारतात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ,परिस्थिती गभीर ....!💥चेन्नईत डीएमकेचे आमदार जे अनबालागन यांचा आज कोरोनामुळे मृत्यू💥

देशात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला असून त्यामुळे चेन्नईत एका आमदाराचा मृत्यू झाला आहे. डीएमकेचे आमदार जे अनबालागन यांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला. याआधी कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर त्यांच्यावर उपाचर सुरू करण्यात आले होते. 61 वर्षीय जे अनबालागन यांचा आजच 62वा वाढदिवस होता.जे अनबालागन यांची प्रकृती रविवारी अचानक खालावली. याआधी त्यांना ऑक्सिझनवर ठेवण्यात आले होते. त्यांना रेला इन्स्टिट्यूट अँड मेडिकल सेंटर रुग्णालयात ठेवण्यात आले होते. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारपासून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नव्हती.

व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आले होते. बुधवारी सकाळी सातच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. अनबालागन हे चेन्नई पश्चिम जिल्ह्यात द्रमुक सचिव होते. कोरोना विषाणूंमुळे एखाद्या लोकप्रतिनिधीच्या मृत्यूची ही पहिली घटना आहे. जे अनबालागन हे द्रविड़ मुन्नेत्र कड़गम (ऊचघ) पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. मुख्य म्हणजे कोरोनाच्या संकटात लोकांना मदत करण्यासाठी जे अनबालागन विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होते. एवढेच नाही तर त्यांनी पक्षाच्या ’ओंदरीनाओव्हॉम कॅम्पेआग्न’  मध्ये सक्रिय सहभाग घेतला होता...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या