💥पुर्णा शहरात जिल्हा प्रशासनाच्या निर्देशांची अक्षरशः पायमल्ली,सोशस डिस्टन्सिंगसह मास्कलाही मुठमाती...!



💥विकासाच्या नावावर नाली बांधकामावरील बांधकाम मजुरांसह परिसरातील नागरिकांच्या जिविताशी खेळ💥

पुर्णा (दि.१७ जुन) कोरोना व्हायरस या जागतिक महामारीचा प्रादुर्भाव वाढू नयें याकरिता केंद्र व राज्य शासनाने देशासह संपूर्ण  राज्यातही २३ मार्च २०२० रोजी लॉकडाऊन संचारबंदीची घोषणा केली तब्बल अडीच महिण्यानंतर शासनाने लॉकडाऊन उठवून संचारबंदीत शिथिलता प्रदान केली.परंतु जिल्हा प्रशासनाने सोशल डिस्टन्सिंग (सामाजिक अंतर) व तोंडावर मास्क लावणे सक्तीचे केले.


जिल्हा प्रशासनाच्या निर्देशा प्रमाणे स्थानिक पातळीवर नगर परिषद प्रशासनाकडून शासकीय निर्देशांची अवज्ञा करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईचे आदेश नगर परिषद प्रशासनाला दिले जिल्हा प्रशासनाच्या निर्देशा प्रमाणे पुर्णा नगर परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शहरात दंडात्मक कारवाईस सुरूवात ही केली परंतु दिव्याखाली अंधार असल्यागत शहरात नगर परिषद प्रशासनाकडून विकासाच्या नावावर शहरातील मुख्य व्यापारपेठेत सुरू असलेल्या नाली बांधकामावर काम करणाऱ्या असंख्य बांधकाम कामगारांना मात्र जिल्हा प्रशासनाच्या निर्देशाची अवज्ञा करण्याची यथेच्छ सुट दिली की काय ? असा गंभीर उपस्थित होत असून नागरी वसाहतीं मधील नाल्यांची बांधकामे अचानक डॉकडाऊन संपताच भर पावसाळ्यात सुरू करण्यात आल्याने अगोदरच मागील अडीच महिण्याच्या कालावधीत प्रत्येक ठिकाणी बेरीकेट लावून रस्ते बंद केल्यामुळे त्रस्त झालेले नागरिक पुन्हा नगर परिषद प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेल्या नाली बांधकामा मुळे जास्तच अडचणीत आल्याचे व या बांधकामावर काम करणाऱ्या कामगारांकडून तोंडावर मास्क न वापरणे सोशल डिस्टन्सिंगच्या निर्देशाची होत असलेली अवज्ञा यामुळे कोरोना विषांणूंना देण्यात येत असलेल्या निमंत्रणा मुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित नाल्यांचे बांधकाम करणाऱ्या गुत्तेदार हा बांधकाम करणारे कामगार व परिसरातील नागरिकांच्या जिविताशी खेळ करीत असल्यामुळे व जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांच्या निर्देशाची अवज्ञा करण्यास कारणीभूत ठरत असल्याने संबंधित गुत्तेदारासह नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या