💥वरिष्ठांच्या आदेशा नंतरही तहसिलदार व मंडळ अधिकाऱ्यांकडुन मालकी हक्कात नाव लावण्यास टाळाटाळ...!💥मांडेखेल येथील शेतकऱ्याने दिला उपोषणाचा इशारा💥 

परळी वैजनाथ (प्रतिनीधी) :-अप्पर जिल्हाधिकार्यांनी आदेश देवुनही खरेदीखताच्या आधारे जमीनीच्या मालकी हक्कावर नाव लावण्यास परळीचे तहसिलदार व मंडळ अधिकार्याकडुन मालकी मागील तीन महिन्यापासुन टाळाटाळ केली जात असुन येत्या तीन दिवसात हे नाव लावले नाही तर अमरण उपोषण करण्याचा इशारा मांडेखेल येथील शेतकरी राजाभाऊ मुकुंद नागरगोजे यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.

 याबाबत तहसिलदार परळी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,खरेदी खत 432/2019 आधारे माझे नाव जमीनीच्या मालकी हक्कात लावावे अशी मागणी केली होती.याबाबत अप्पर जिल्हाधिकारी अंबाजोगाई यांच्याकडे दाद मागितली असता त्यांनी दि.16 मार्च 2020 रोजी माझ्या बाजुने निकाल देवुन गट क्र.124 मधील 1 हेक्टर 44 गुंठे व माळहिवरा शिवारातील गट क्र.133 मधील 1 हेक्टर 72 गुंठे जमीनीच्या मालकी हक्कात अप्पर जिल्हाधिकार्यांच्या निकालानुसार नाव लावावे अशी मागणी केलेली होती तसेच याबाबत अनेकवेळा आपणाकडे व मंडळ अधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे.दि.1 जुन रोजी आपणाकडे रितसर निवेदन दिले आहे परंतु त्या निवेदनाची पोंहच पावती न देता आपण आपल्या वरिष्ठ अधिकार्यांचे आदेशही पाळले नाहीत येत्या तीन दिवसात आपण व मंडळ अधिकार्यांने माझे नाव जमीनीच्या मालकी हक्कात लावले नाही तर अमरण उपोषण करण्याचा इशारा मांडेखेल येथील शेतकरी राजाभाऊ मुकुंद नागरगोजे यांनी दिला आहे.या निवेदनाच्या प्रति पालकमंत्री धनंजय मुंडे,जिल्हाधिकारी बीड,अप्पर जिल्हाधिकारी अंबाजोगाई,उपविभागीय अधिकारी परळी,पोलिस ठाणे परळी ग्रामीण यांना देण्यात आल्या आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या