💥कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर सोशल डिस्टन्सींगसह अन्य गोष्टीची खबरदारी घ्यावी - जिल्हाधिकारी



💥नागरीकांनो घाबरू नका वयोवृध्दाची काळजी घ्या असेही आवाहन जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी केले💥

परभणी (दि.२६ जुन) - कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांनी सोशल डिस्टन्सींगसह अन्य गोष्टीची खबरदारी बाळगावी. घाबरू नये, असे आवाहन जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी केले आहे. 

सोशल डिस्टन्सींग पाळण्यासह मास्क वापरावा, सार्वजनिक ठिकाणी थूंकू नये.सर्दी,ताप, खोकला, घसा खवखवने,श्‍वास घेण्यास त्रास होणे अशी कोण्याही व्यक्तीची तक्रार आल्यास घाबरू न जाता, घरी न थांबता तातडीने नजीकचे रुग्णालय गाठावे व वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घ्यावा. विशेषतः वयोवृध्द, ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता, लहान मुले, उच्च रक्तदाब, अनियंत्रणीत मधुमेह व गंभीर आजार असणा-या सदस्यांची जास्त काळजी घ्यावी. आजार अंगावर न काढता वैद्यकीय सल्ला घ्यावा. औषधोपचार तातडीने घ्यावे, असे दोघां अधिका-यांनी नमुद केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या