💥पुर्णा तहसिल कार्यालयात कोरोना पार्श्वभूमीवर आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांची आढावा बैठक....!



💥आढावा बैठकीत आ.डॉ.गुट्टे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना केले आर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचे वाटप💥

पूर्णा (दि.15 जुन) प्रतिनिधीआमदार रत्नाकर रावजी गुट्टे यांची कोरोना पार्श्वभूमीवर तहसील कार्यालय पूर्णा येथे आढावा बैठक व आर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचा वाटप कार्यक्रम.बैठकी दरम्यान त्यांनी प्रातिनिधीक स्वरूपात तालुक्यातील कोरोना आजाराविषयी ची सद्यस्थिती व राबवत असलेल्या उपाययोजना या विषयाची माहिती घेतली. तसेच यावेळी त्यांनी स्वतः तालुक्यातील अधिकाऱ्यांना अर्सनिक अल्बम 30 होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप केले व रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्या करिता या गोळ्या कशा लाभ कारक आहेत .तसेच या गोळ्या घेण्याची पद्धत पथ्यपाणी याविषयी माहिती दिली .



          तसेच तालुका भरात त्यांच्यामार्फत या गोळ्यांचे वाटप करण्या चे उद्दिष्ट समोर असल्याचे सांगितले. याकामी तालुक्यातील विविध कार्यालयांनी सहकार्य करावे ही अपेक्षा व्यक्त केली .या सहित उपस्थित अधिकाऱ्यांना त्यांनी शेतकऱ्यांच्या काही समस्या नागरिकांच्या मागण्या याविषयी सूचना केल्या.

        बैठकीस तहसीलदार वंदना मस्के, गट विकास अधिकारी एस. के. वानखेडे ,तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संदीप काळे, एच .डी .गाडेकर, तालुका कृषी अधिकारी आर. एच. तांबिले ,उपविभागीय अधिकारी लासिना पाटबंधारे उपविभाग एस. एम. मामीडवार, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था आर .आर. सावंत, शाखा अभियंता लासिना पाटबंधारे उपविभाग पूर्णा पी .जी. रणवीर व इतर कार्यालय प्रमुख उपस्थित होते तसेच राष्ट्रीय समाज पक्ष व गुट्टे काका मित्रमंडळा चे संपर्कप्रमुख माधवराव गायकवाड ,गणेश कदम ,बापूराव डुकरे, गजानन माने ,नागेश इंगळे आदी उपस्थित होते प्रास्ताविक वेंकटेश पवार यांनी केले तर शिव प्रसाद देवणे यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या