💥परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात आज २६ संशयीत रुग्ण दाखल...!



💥शहरातील वृंदावन कॉलनीतील युवती कोरोनामुक्त,संक्रमीत कक्षात 5 रूग्णांवर उपचार💥

परभणी (दि.२३ जुन) येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील संक्रमीत कक्षातील कोरोनाबाधित शहरातील वृंदावन कॉलनीतील २१ वर्षीय युवती कोरोनामुक्त झाल्याने प्रशासनाने सर्व औपचारिकता पूर्ण करीत या युवतीस डिस्चार्ज दिला.
मंगळवार दि.२३ जुन रोजी २६ संशयित दाखल झाले असून एकूण संशयितांची संख्या २६०८ एवढी झाली आहे. दरम्यान, नांदेड येथील प्रयोगशाळेकडून ३० जणांच्या स्वॅबचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी २ स्वॅब पॉझीटीव्ह व २८ जणांचे स्वॅब निगेटीव्ह आले आहेत.




आजपर्यंत २८०४ स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले असून त्यापैकी २५७९ जणांचे स्वॅब निगेटीव्ह आले आहेत.मंगळवारी २६ जणांचे स्वॅब नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. आतापर्यंत ८० अनिर्णायक ४७ स्वॅब तपासणीस आवश्यक नसल्याचा अहवाल नांदेड प्रयोगशाळेद्वारे  प्राप्त झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९८ रुग्णांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला. ९० रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने  जिल्हा रुग्णालय प्रशासनाने त्या रुग्णांना डिस्चार्ज दिला. आता रुग्णालयात पाच कोरोनाबाधित रूग्ण उपचार घेत आहेत. विलगीकरण केलेल्या कक्षात १०३ रुग्ण असून विलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झालेले २५०० एवढे व्यक्ती आहेत,अशी माहिती जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या