💥पुर्णा तालुक्यातील ताडकळस हद्दीतील पिंपरी देशमुख येथे जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या विशेष पथकाची धाडसी कारवाई...!💥ताडकळस हद्दीत धाडसी कारवाईत वाळु माफियांकडून १२ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त💥

परभणी(१० जुन) जिल्ह्यातील वाळू माफियांकडून पुर्णा-गोदावरी नदीपात्रावर सातत्याने खुलेआम दरोडे घालण्याचे सत्र चालतांना दिसत असून जिल्ह्यातील पुर्णा-परभणी-पालम-गंगाखेड या भागातल्या पुर्णा-गोदावरी नदीपात्रात वाळू माफिया मोठ्या प्रमाणात राजरोसपणे सेक्शन पंप (बोट) तसेच जेसीबी मशीन तसेच तराफ्यांच्या साहाय्याने प्रचंड प्रमाणात प्रतिरोज हजारो ब्रास चोरट्या वाळूचे उत्खनन करीत चोरट्या वाळूची असंख्य वाहनांतून प्रशासनाच्या नाकावर टिच्चुन तस्करी करीत असल्याचे पाहावयास मिळत आहे. पुर्णा-गोदावरी नदीपात्रात वाळू माफियांनी खुलेआम दरोडे घालण्याचे सत्र आरंभल्याचे मागील कारवायांतून उघड झाल्याने त्या भागातील महसुल प्रशासन पोलीस प्रशासनाचे अधिकारी आर्थिक तडजोडीतून डोळेझाक करीत आहेत की वाळू माफियांच्या दहशतीखाली कारवाई करण्यास धजावत नाहीत ? याची सुध्दा सखोल चौकशी जिल्ह्यातील कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी श्री.दिपक मुगळीकर व जिल्ह्याचे कर्तव्यकठोर जिल्हा पोलीस अधिक्षक श्री.कृष्णकांत उपाध्याय यांनी करणे आवश्यक आहे कारण स्थानिक पातळीवर महसुल व पोलीस प्रशासन वाळू तस्करी रोखण्यास अकार्यक्षम ठरत असल्याने वाळू माफियांनी मोठ्या प्रमाणात पुर्णा-गोदावरी नदीपात्रावर आपले अवैध साम्राज्य स्थापन करून महसुल व पोलीस प्रशासना पुढे आव्हान निर्माण केले असल्यामुळे जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या विशेष पथकाला या अवैध वाळू तस्करी विरोधात धडक मोहीम राबवावी लागत असल्याचे निदर्शनास येत आहे.


जिल्ह्यातील पुर्णा तालुक्यातल्या ताडकळस पोलीस स्थानकाच्या हद्दीतील व परभणी तालुक्यात येणाऱ्या पिंपरी देशमुख शिवारातून वाहणाऱ्या पुर्णा नदीच्या पात्रात आज बुधवार दि.१० जुन रोजी मध्यरात्री ०२-०० वाजेच्या सुमारास जिल्हा पोलिस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्या विशेष पथकाने अचानक छापा टाकला अन् नदी पाञातून बेकायदा वाळु उपसा व वाहतुक
करणाऱ्या एका टॅक्टर मालकास टॅक्टर व वाळुच्या साठ्यासह ताब्यात घेतले. या कारवाई वेळीच एक टिप्पर चालक व मालकाने घटनास्थळावरून पोबारा केला.पण त्याने टिप्पर पाञाच्या काठावरच सोडून दिला.त्यात तीन ब्रास वाळुचा साठा होता. विशेष पथकाने तो टिप्पर व वाळुचा साठा जप्त केला.

विशेष पथकाने धाडसी कारवाई नंतर ताडकळस पोलिस ठाण्यात दोनही वाहने,वाळुच्या साठयासह आणुन उभी केली.त्यात बारा लाख सत्ताविस हजार रूपयांचा मुद्देमाल जमा करण्यात आला.टॅकर मालक नवनाथ डुकरे रा.पिंपरी देशमुख यांस ताडकळस पोलिसांच्या स्वाधीन केले.
टॅक्टर ,टिप्पर मालक व चालकाविरुद्ध ताडकळस पोलिस गुन्हा दाखल करण्याची कारवाई सकाळी सुरू होती.
जिल्हा पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आर रागसुधा यांच्या नेतृत्वाखाली कारवाई केलेल्या या पथकात पोलिस अधिकारी ए.जी पांचाळ, हनूमान कच्छवे यांच्यासह सखाराम टेकुळे, जगदिश रेड्डी,श्रीकांत घनसांवत,अतुल कांदे यांचा समावेश होता.

💥ताडकळस पोलीस स्थानकाचे सपोनि.शिवदास लहाणे यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह💥

ताडकळस हद्दीतील पिंपरी देशमुख येथील पुर्णा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन व वाळूची तस्करी होत असतांना ताडकळस पोलीस प्रशासनाचे स.पो.नि.लहाणे या खुलेआम होणाऱ्या अवैध वाळू तस्करी विरोधात कारवाई करण्यास का अकार्यक्षम ठरले याची सुध्दा सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे मत जनसामान्यांतून व्यक्त होतांना दिसत आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या