💥परभणीतील विज वितरण कंपनीतील लाचखोर उपव्यवस्थापक प्रकाश टाक लाच स्विकारतांना अटक..!



💥सेवानिवृत्त उपकार्यकारी अभियंत्यास सेवानिवृत्तीनंतर मिळणारे क्लेम काढण्यासाठी मागितली २ हजाराची लाच💥

परभणी (दि.२२)-येथील वीज वितरण कंपनीच्या मानव संसाधन विभागातील उपव्यवस्थापक प्रकाश सुधाकर टाक यास २ हजार रुपयांची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी आज सोमवार दि.२२ जुन रोजी यशस्वीरित्या सापळा रचून ताब्यात घेतले. 

या प्रकरणात येथील एका तक्रारदाराने १२ जून २०२० रोजी लाचलुचपत प्रतिबंधक खात्यात स्वतः एक तक्रार दाखल केली. त्यातून आपण २८ वर्षाच्या सेवेनंतर उपकार्यकारी अभियंता म्हणून सेवानिवृत्त झालो. त्याचे सेवानिवृत्तीनंतर मिळणारे क्लेम करिता संबंधीत कर्मचारी लाच मागत असल्याचे नमुद केले. या खात्याच्या अधिकाऱ्यांनी लगेच सापळा रचला अन् पंचासमक्ष वीज कंपनीच्या मानव संसाधन विभागा क्रमांक २ केलेल्या कारवाईत तक्रारकर्त्यांकडून उपव्यवस्थापक प्रकाश सुधाकर टाक याला २ हजार रूपयांची लाच स्विकारतांना ताब्यात घेतले.त्याच्या विरोधात कोतवाली पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, पोलिस निरीक्षक अमोल कडू, अनिल कटारे, अनिरूध्द कुलकर्णी, सचिन धबडगे, जमिल जहागीरदार, मिलिंद हनुमंते, शेख शकील, शेख मुखीद, माणिक चट्टे, सारिका टेहरे, रमेश चौधरी, जनार्दन कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या