💥शांतीस्वरूप बौद्ध यांनी आपलं संपूर्ण आयुष्य बौद्ध धम्म प्रचार-प्रसारासाठी व्यतीत केल - श्रीकांत हिवाळे



💥पुर्णा येथे बौद्ध महासभेच्या वतीने मा.अध्यक्ष बाबाराव वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली झाले अभिवादन सभेचे आयोजन💥 

पूर्णा (दि.10 जुन) भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, बौद्ध धम्माचे गाढे अभ्यासक, प्रसिध्द लेखक शांतीस्वरूप बौद्ध यांचे दि. 6 जून रोजी निधन झाले. या अनुषंगाने भारतीय बौद्ध महासभा, तालुका शाखा पूर्णाच्या वतीने बाबाराव वाघमारे, माजी तालुका अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. 

       याप्रसंगी तालुका उपाध्यक्ष ज्ञानोबा जोंधळे, जिल्हा संघटक लक्ष्मण गायकवाड, सुनील खाडे, मुंजाजी गायकवाड यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दिवंगत शांतीस्वरूप बौद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात येऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शांतीस्वरूप बौद्ध यांच्या जीवनकार्यावर बोलतांना श्रीकांत हिवाळे म्हणाले की, शांतीस्वरूप बौद्ध यांनी आपलं संपूर्ण आयुष्य बौद्ध धम्म प्रचार-प्रसारासाठी खर्च केले. ते जागतिक दर्जाचे बौद्ध साहित्याचे अभ्यासक, निष्णात लेखक विशुद्ध आचारवंत होते. त्यांच्या निधनामुळे देश एका महान अभ्यासकाला मुकला आहे.
      या अभिवादन सभेचे सूत्रसंचालन तुकाराम ढगे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या