💥परभणीत स्थानिक गुन्हा अन्वेषन विभागाच्या पथकाची धाडसी कारवाई...!💥पथकाने धाडसी कारवाईत केला 5,72,400 रुपयांचा तंबाखू साठा जप्त💥

परभणी - (दि.05 जुन)-येथीस नानलपेठ पोलिस स्थानकाच्या हद्दीतील एका ट्रान्सपोर्टसमोर उभ्या असणाऱ्या कंटेनरमधून स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या एका पथकाने तब्बल 5,72,400/- रुपयांचा प्रतिबंधीत तंबाखू साठा जप्त करण्याची धाडसी कारवाई केली.

स्थानिक गुन्हें अन्वेशन विभागाने रेकॉर्ड़वरील गुन्हेगारांच्या विरोधात मोहिम सुरू केली असतांना एका ट्रान्सपोर्टसमोर आर.जे.52 जीए-3742 या क्रमांकाचा कंटेनर पथकास उभा केलेला दिसला यावेळी पथकास संशय आला. तेव्हा चौकशी सुरू केली असता त्या हरियाणातील गुरग्रामच्या कंटेनर चालकाने इलेक्ट्रॉनिक्स पार्ट,भांडे,स्टेशनरी,ताडपत्री वगैरे माल असल्याचे पथकास त्याच्या बोलण्यावरून गितले नमुद केले. पथकाचा संशय बळावला असता त्यात कोणताही नाव नसणा-या तंबाखूचे 160 पाकिट एकूण वजन 80 किलो प्रतिकिलो 2 हजार रुपये किंमत रत्नाछाप तंबाखूचे एकूण 800 बॉक्स एकूण वजन 192 किलो, प्रत्येक बॉक्स 378 रुपये प्रमाणे,रत्नाछाप तंबाखू 403 पॅक व अशोक लेलॅन्ड कंपनीचा एक कंटेनर असा एकूण 30 लाख 72 हजार 400 रुपयाचा मुद्देमाल पथकाने जप्त केला. पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलिस अधीक्षक रागसुधा आर, पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनेश मुळे, सुग्रीव केंद्रे, मधुकर चट्टे, हनुमंत जक्केवाड, शंकर गायकवाड, अरूण पांचाळ यांनी ही कारवाई केली...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या