💥मानवत येथे दोन मोटारसायकलस्वाराची समोरसमोर धडक झाल्याचे कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी...!💥शुल्लक कारण ठरले वादाला कारणीभूतः हाणामारीत दोघे जखमी💥

मानवत (दि.१८ जुन) - येथील नगरपालिकेच्या कार्यालयासमोर आज गुरूवार दि.१८ जुन रोजी सायंकाळी ०४-४५ वाजेच्या सुमारास मोटारसायकलस्वाराची समोरा समोर धडक झाल्याच्या कारणा वरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली असून या घटनेत दोघे जन जखमी झाले.या घटनेचे पडसाद उमटले असून परिणामी मानवत शहरात मोठा तणाव उद्भवला आहे.

भारतीय जनता पक्षाचे डॉ.अंकुश लाड व तेथील एका व्यापाऱ्याच्या मोटारसायकलची नगरपालिका कार्यालयासमोर समोरासमोर धडक झाली.त्यात दोघेही मोटारसायकवरून खाली पडले. त्याच वेळी लाड यांच्या एका समर्थकाने समोरच्या मोटारसायकस्वारास जाब विचारला. तेव्हा दोघांत वाद झाला. त्याचे पर्यायवसन संबंधीत व्यापाऱ्याच्या समर्थकांनीही घटना स्थळाकडे धाव घेतली. अन् पालिका कार्यालयासमोर दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली. त्यात डॉ.लाड व त्याचे समर्थक दोघेही जखमी झाले. त्या दोघांना तातडीने तेथील खासगी रुग्णालयात दाखल केल्या गेले आहे. दरम्यान, या घटनेनंतर समर्थकांनी घटनास्थळावरून पोबारा केला. पोलिस तात्काळ धावून आल्याने अनर्थ ठळला या घटने नंतर तणाव झाल्याने व्यापारी पेठाही तातडीने बंद झाल्या. मानवत शहरात सायंकाळी उशिरापर्यंत तणाव होता....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या