💥पुर्णा तालुक्यातील चुडावा पोलीस स्थानका अंतर्गत येणाऱ्या पिंपळगाव (लि) येथे चोरट्यांनी फोडले घर..!💥एकुण २१ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळवला घटने संदर्भात चुडावा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल💥

पुर्णा (दि.३० जुन) - तालुक्यातील पिंपळगाव (लि) येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत नगदी रोकड व मोबाईल लांबवल्यची घटना रविवारी २८ रोजी मध्यरात्री घडली असून या प्रकरणी चुडावा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

       चुडावा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपळगाव येथील राजु बाबाराव मोरे हे रविवारी २८ रोजी आपल्या घरात झोपलेले असताना मध्यरात्री २ ते ४ च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून घरातील एक १० हजार व ६ हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल एक बॅटरी, एक नऊवारी लुगडे व घरातील २ हजार ९०० रुपये नगदी असा एकुण २१ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला.याप्रकरणी राजु बाबाराव मोरे रा.पिंपळगाव (लि) यांनी चुडावा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून चुडावा पोलीसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास जमादार नामदेव सुजलोड करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या