💥परभणीत पुन्हा एक कोरोना बाधीत; पुण्यातुन परतलेल्या एका ४५ वर्षीय महिलेचा अहलाल आला पाॅझीटीव्ह..!💥जिल्ह्यात रुग्ण संख्या ९६ वर पोहचली असुन यापैकी ८९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे💥

परभणी (दि.२० जुन) - परभणी शहरात सलग दुसऱ्या दिवशी खंडोबा बाजार परिसरात दि.१८ रोजी पुण्यातुन परतलेल्या एका ४५ वर्षीय महिलेचा अवहाल कोरोना पाॅझीटीव्ह आल्याचा निर्वाळा शनिवारी २० रोजी सायं जिल्हा रुग्णालयाने केला आहे.परभणी जिल्ह्याची रुग्ण संख्या ९६ वर पोहचली असुन यापैकी ८९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे. 

        एका पाठोपाठ एक रुग्ण कोरोनावर मात करून घरी जात असतानाच शुक्रवारी १९ रोजी रात्री कारेगांव रोड परिसरातील सुंदराई नगर येथील एक ईसम कोरोना बाधीत असल्याचा अवहाल प्राप्त झाला होता. पुणे येथून परभणीच्या अपनाकाॅर्नर, खंडोबा बाजार भागात परतलेली एक महीला शनिवारी२० रोजी सायं पाॅझीटीव्ह असल्याचा अवहाल प्राप्त झाला असल्याने,परभणी जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ९६ वर पोहचली आहे.कोरोनामुक्त होऊन आज रोजी पर्यंत ८९ रुग्ण घरी पाठवले तर ३ रुग्णांचा यापुर्वीच मृत्यू झाला आहे.सदरील भाग पुढील तीन दिवसांसाठी प्रतिबंधीत करण्यात आला असून,या महिलेवर जिल्हा शासकीय रुग्णालयात औषध उपचार सुरू झाले आहेत तीची प्रकृती स्थीर असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे..
-------------------------------------------------------------------

कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने अपना कॉर्नर, खंडोबा 
बाजार परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर
------------------------------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या