💥बिड जिल्ह्यात गेवराई तालुक्यातील बागपिंपळगाव कॅम्प तलवाडा फाटा येथील केमिस्ट दुकानाला आग लागून स्फोट...!



💥स्फोटात डॉ.सुधाकर भाऊसाहेब चोरमले यांचा होरपळून मृत्यू तर अन्य एकजन जख्मी💥 

बिड(०८ जुन)-जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात असलेल्या बागपिंपळगाव कॅम्प तलवाडा फाटा येथील केमिस्ट दुकानाला आग लागून स्फोट झाल्याची दुर्दैवी घटना रविवार दि.०७ जुन २०२० रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून या स्फोटात डॉ. सुधाकर भाऊसाहेब चोरमले यांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर या घटनेत एक जण जखमी झाला आहे.

दरम्यान, ही घटना नेमकी काय आहे, याचे कारण स्पष्ट झाले नसले तरी याबाबत चर्चेला उधाण आले आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी तपास सुरू केला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील जायकवाडी वसाहत, बागपिंपळगाव येथील डॉ. सुधाकर चोरमले यांचा तलवाडा फाटा येथे दवाखाना असून त्यालगत बेलगाव येथील मोरे यांचे केमिस्ट दुकान आहे. गेल्या पंधरा दिवसापासून या दवाखाना व मेडिकलच्या बाजूला डॉ. औटे यांचे मानव कल्याण सेवाभावी संस्था संचलित साई बाबा स्वास्थ केंद्र कार्यरत झालेले आहे.

रविवार 7 जून रोजी मध्यरात्री 2 च्या सुमारास या केमिस्ट दुकानाला आग लागली असून या आगीत बाजूला असलेल्या साई समर्थ दवाखान्याचे डॉ. सुधाकर भाऊसाहेब चोरमले यांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेत त्यांच्यासोबत असलेला एक जण जखमी झाला आहे. या घटनेबाबत परिसरात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या