💥परभणीत कोरोनाचा बुधवारी चौकार; जिल्हा रुग्णालयातील १ महीला कर्मचारीसह ४ जणं कोरोना पाॅझीटीव्ह...!💥दिवसभरात सापडले चार रुग्ण,परभणी शहरात तीन दिवस संचारबंदी - जिल्हाधीकारी मुगळीकर

परभणी (दि.२४ जुन) - परभणी शहरात कोरोनाने बुधवारी २४ रोजी चौकार लगावला असुन आज सापडलेल्या एकुण चार रुग्णांमध्ये जिल्हा रुग्णालयातील एक महीला कर्मचा-याचा समावेश आहे.त्यामुळे जिल्ह्यात  कोरोनाचा कर्दकाळ ठरलेल्या जिल्हाधिकारी दिपक मुगळीकरांनी खबरदारीचा उपाय म्हणून आज मध्यरात्रीपासून पुढील तीन दिवसांसाठी महापालिका हद्दीत संचारबंदी घोषित केली आहे. 


      मागील काही दिवसांपासून परभणी शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येला जिल्हाधिकारी दिपक मुगळीकरांनी घेतलेल्या कठोर निर्णय यामुळे काही अंशी ब्रेक लागला होता.दरम्यान जिल्हाबंदी सुरू ठेऊन जिल्ह्यात बाजारपेठेतील व्यवसायास शिथीलता आणली होती.पक्षंतु मागील सात ते आठ दिवसांत सहा ते सात रुग्ण आढळून आले.त्यातच आज कोरोनाने परभणी शहरावर वक्र दृष्टी फिरवून आज बुधवारी २४ रोजी चौकारच ठोकला त्यात रुग्णा प्रभाग क्रमांक सहामधील इक्बालनगर व प्रभाग क्रमांक सातमधील अपना काॅनर परिसरातील एक व्यक्ती तसेच गव्हाणे रस्त्यावर एक कोरोंनाबाधीत आढळल्या पाठोपाठ आणखीन एक चौथा बाधीत रूग्ण आढळला आहे. जिल्हा शासकीय रूग्णालयातीलच एक महिला कर्मचारी पाॅजिटिव्ह आढळली आहे.त्यामुळे कोरोंनाबाधीत रूग्णांच्या संखेने शतकावर कळस चढवला आज जिल्ह्यात कोरोना बाधीतांचा आकडा १०२ वर पोहचला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १०२ रुग्णांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. त्यापैकी ३ जणांचा मृत्यू झाला. ९० रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने  जिल्हा रुग्णालय प्रशासनाने त्या रुग्णांना डिस्चार्ज दिला. आता रुग्णालयात ९ कोरोनाबाधित रूग्ण उपचार घेत आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या