💥बिड जिल्ह्यात कोरोनाचा कहर सातत्याने सुरूच,आज २१ जुन रोजी शहरात १ तर पाटोदा तालुक्यात ४ रुग्ण आढळले...!💥आज पाठविलेल्या ३१ स्वॅब पैकी २३ संशयीतांचे अवहाल निगेटिव्ह आले💥

बिड (दि.२१ जुन) - शहरासह जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्ण सापडण्याची अखंडीत शृंखला सुरुच असुन आज रविवार दि.२१ जुन रोजी प्राप्त अवहालानुसार बीड शहरात १ तर पाटोदा तालुक्यात ४ रुग्ण आढळून आले आहे.

      कोरोना संक्रमण काळात दिवसेंदिवस अनलाॅक-१ घातक ठरत असुन शहरासह जिल्ह्यात  बाजारपेठेतील व्यवसायास दिलेल्या सवलतीमुळे कोरोनाच्या संसर्गात मोठ्या प्रमाणात वाट झाल्याचे दिसून येत आहे.आज जिल्हा रुग्णालयास प्राप्त झालेल्या अवहालानुसार बीड शहरातील  शहेनशहा नगरातील एक २५ वर्षे पुरूष तर पाटोदा येथील माळी गल्लीत ११ व ३० वर्षे स्त्री, ०७ व ३३ वर्षे पुरूष अश्या चार जणांना कोरोनाची लागणं झाली आहे.आज पाठविलेल्या ३१ स्वॅब पैकी २३ संशयीतांचे अवहाल निगेटिव्ह आले आहेत.तर३ आवहाल प्रलंबित आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या