💥परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो पेरणीची घाई गडबड करू नका....!



💥सूचना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापाठातील हवामानशास्त्र विभागाच्या वतीने देण्यात आल्या💥 

परभणी (दि.१२जुन) - मराठवाडयात पुढील पाच दिवसांत आकाश स्वच्छ ते ढगाळ राहिल. 10 ते 13 जून या दरम्यान तुरळक,काही ठिकाणी हलका ते मध्यम व 14 जून रोजी तुरळक ठिकाणी मध्यम ते भारी पावसाची शक्यता आहे.परंतू पुढील पाच दिवसांत पडणारा पाऊस हा पुर्वमौसमी असल्यामुळे शेतक-यांनी पेरणीची घाई गडबड करू नये. मौसमी पाऊस 75 ते 100 मिमी झाल्याशिवाय पेरणी करू नये, अश्या सूचना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापाठातील हवामानशास्त्र विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहे.

या विभागाने प्रसिध्द केलेल्या प्रसिद्धी पत्रकात शेतक-यांनी सद्याच्या परिस्थितीत पेरणीची पुर्वतयारीची कामे करून घ्यावीत, असे नमुद केले आहे. तसेच कापूस, तूर, मुग, उडीद, भुईमुग, मका वगैरे पिकांत आंतरपीक म्हणून काय घेता येईल, याबाबत प्रसिद्धी पत्रकमधून सूचना  करण्यात आली आहे. पुरेसा पाऊस झाल्याशिवाय शेतक-यांनी केळीची लागवड करू नये. पुर्वी लागवड केलेल्या बागेत आंतरमशागतीची कामे पूर्ण करून घ्यावीत. अश्या सूचना देण्यात आल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या