💥पुर्णेतील मा.नगरसेवक जाधव यांनी गरजूंना अन्नधान्य व मिठाई वाटप करून साध्या पध्दतीने केला वाढदिवस साजरा..!💥कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर २०० गोरगरीब,गरजू कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप💥 

परभणी/पूर्णा (दि.०७ जुन) परभणी टायगर ग्रुपचे जिल्हाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांच्या तर्फे कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर ठेवून दोनशे गरीब, गरजू कुटुंबांना किमान दहा दिवस पुरेल एवढे अन्नधान्याचे वाटप करण्यात आले त्यासोबतच वाढदिवसानिमित्त मिठाई सुध्दा वाटण्यात आली. 


          भारतीय संविधान गौरव समिती व विविध पक्ष, संघटनांच्या वतीने संविधान गौरव समितीच्या कार्यालयामध्ये रि.पा.ई नेते प्रकाश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली मोजक्या उपस्थितीत स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. माजी उपनगराध्यक्ष उत्तमभैया खंदारे, नगरसेवक धम्मदीप जोंधळे, श्रीकांत हिवाळे सर यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन त्यांच्या गौरवशाली कार्याचा आढावा घेतला. अध्यक्षीय भाषणात रिपाई नेते प्रकाश कांबळे यांनी सुनील जाधव यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकतांना सांगितले की, *सामाजिक बांधिलकी जपणारं एक संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणजे सुनील जाधव. राजकारण, समाजकारण करतांना सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याच काम त्यांनी केलं.*


          या स्वागत सोहळ्यास जयंती मंडळाचे अध्यक्ष अमृतराव मोरे, कामगार नेते अशोक कांबळे, विजय जोंधळे, पत्रकार विजय बगाटे, बोद्धाचार्य त्र्यंबक कांबळे, प्राचार्य केशवराव जोंधळे यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन शाहीर गौतम कांबळे यांनी तर आभार मोहन लोखंडे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या