💥परभणी जिल्ह्यात बाजारपेठा जैसे थे सुरू राहणार पुढील आदेशापर्यंत निर्णय लागू...!



💥असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी आज रविवार दि.२१ जुन रोजी दिले💥

परभणी (दि.२१ जुन)- शहरासह जिल्ह्यातील ज्या अस्थापना व अत्यावश्यक बाबींना जिल्हा प्रशासनाने दि.३१ मे २०२० रोजी दिलेल्या आदेशाप्रमाणे सुट दिली. त्या सर्व अस्थापना, अत्यावश्यक बाबींना सकाळी ०९-०० ते सायंकाळी ०५-०० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास शुध्दीपत्रकाद्वारे प्रशासनाने आज रविवार दि.२१ जून पर्यंत परवानगी बहाल केली होती. 

ज्या अस्थापना, अत्यावश्यक बाबींना या कार्यालयाने सुट दिलेली आहे. त्या अस्थापना सकाळी ०९-०० ते सायंकाळी ०५-०० वाजेपर्यंत पुढील आदेश येईपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा बहाल करण्यात येत आहे. तसेच ज्या अस्थापने व दुकाने यांना सुट दिलेली नाही ती दुकाने बंदच राहतील, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी आज रविवार दि.२१ जुन रोजी दिले आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या