💥 नांदेड काँग्रेसच्यावतीने वाहतूक शाखेतील पोलिस कर्मचार्‍यांना कोरोना सुरक्षा कीटचे मोफत वाटप...!



💥काँग्रेसचे नेते खा.राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या दि.१९ जुन रोजी करण्यात येणार वाटप💥

नांदेड (दि.१८ जुन) - काँग्रेसचे नेते खा.राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने कोरोनाच्या काळात वाहतूक शाखेची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळणार्‍या जिल्ह्यातील सर्व पोलिस कर्मचार्‍यांना मोफत कोरोना सुरक्षा कीटचे वाटप करण्यात येणार आहे.

उद्या शुक्रवारी दि.19 जून  रोजी सकाळी 8 वाजता येथील कुसुम सभागृहामध्ये  होणार्‍या या कार्यक्रमास जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डी.पी.सावंत, आ.मोहनराव हंबर्डे, आ.बालाजीराव कल्याणकर, आ.माधवराव पाटील जवळगावकर, आ.रावसाहेब अंतापूरकर, माजी आ.ईश्वरराव भोसीकर, माजी आ.वसंतराव चव्हाण, माजी आ.हणमंतराव पा.बेटमोगरेकर, महापौर सौ.दीक्षा धबाले, पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर आदींची उपस्थिती राहणार आहे.


खा.राहुल गांधी यांचा वाढदिवस काँग्रेस पक्षाच्यावतीने विविध उपक्रम राबवून देशभर साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यातील शहर वाहतूक शाखेत काम करणार्‍या सर्व कर्मचार्‍यांना कोरोनाची सुरक्षा कीट मोफत वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील वाहतूक शाखेत काम करणारे पोलिस कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता मागील तीन महिन्यांपासून आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी काँग्रेसच्यावतीने मोफत सुरक्षा कीट देण्यात येणार असल्याची माहिती विधान परिषदेतील काँग्रेसचे प्रतोद व काँग्रेसचे महानगराध्यक्ष आ.अमरनाथ राजूरकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, जि.प.अध्यक्षा सौ.मंगाराणी अंबुलगेकर, जि.प.चे शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे, समाजकल्याण सभापती अ‍ॅड.रामराव नाईक, कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर, महिला व बालकल्याण सभापती सौ.सुशीलाताई बेटमोगरेकर यांनी दिली.

काँग्रेसच्यावतीने आरोग्य सेवेत काम करणार्‍या कर्मचार्‍यांना धान्याची किट मोफत वाटप
नांदेड - काँग्रेसचे नेते खा.राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने कोरोनाच्या काळात आरोग्य सेवेत अहोरात्र काम करणार्‍या आशा वर्करस, नर्सेस, अंगणवाडी सेविका यांना धान्याची मोफत कीट देण्यात येणार आहे.
उद्या शुक्रवारी दि.19 जून  रोजी सकाळी 9.30 वाजता येथील डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहामध्ये  होणार्‍या या कार्यक्रमास जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डी.पी.सावंत, आ.मोहनराव हंबर्डे, आ.बालाजीराव कल्याणकर, आ.माधवराव पाटील जवळगावकर, आ.रावसाहेब अंतापूरकर, माजी आ.ईश्वरराव भोसीकर, माजी आ.वसंतराव चव्हाण, माजी आ.हणमंतराव पा.बेटमोगरेकर,  जि.प.अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर आदींची उपस्थिती राहणार आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाच्या काळात विविध समाज घटकांना मदत करण्याचे काम सुरु आहे. यापूर्वी जिल्ह्यातील राशनकार्ड नसलेल्या हजारो गरीबांना काँग्रेस पक्षाने धान्य कीटचे मोफत वाटप केले आहे. त्यासोबतच पत्रकार क्षेत्रातील काम करणारे कर्मचारी, विविध धर्मातील पूजा-पाठ करणारे पुजारी यांच्यासह अनेकांना काँग्रेस पक्षाच्यावतीने मोफत धान्याची कीट देण्यात आली आहे.
याचाच एक भाग म्हणून कोरोनाच्या काळात अतिशय अवघड असे काम करणार्‍या आशाताई वर्करस, नर्सेस, अंगणवाडी सेविका यांना या कीटचे वाटप करण्यात येणार असल्याची महिती काँग्रेसचे महानगराध्यक्ष आ.अमरनाथ राजूरकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, महापौर सौ.दीक्षा धबाले, उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर, स्थायी समितीचे सभापती अमितसिंह तेहरा, सभागृह नेते सरदार विरेंद्रसिंघ गाडीवाले, महिला व बालकल्याण सभापती सौ.प्रकाशकौर खालसा, उपसभापती आरशिया कौसर यांनी दिली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या