💥नांदेडमध्ये कोरोनाचा कहर आज दिवसभरात २१ रुग्ण सापडले..!💥जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढून ती २२४ पर्यंत पोहचली💥

नांदेड (दि.११ जुन) नांदेड मध्ये कोरोना बाधीत रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होतांना दिसत असून कोरोना विषाणूंचा कहर सातत्याने होतांना दिसत आहे.


शहरात काल १० रुग्ण सापडल्याच्या घटने नंतर आज गुरुवार दि.११ जुन रोजी तब्बल २१ रुग्ण सापडल्याने नांदेड पुन्हा  एकदा हादरले आहे.आज सकाळी ५ रुग्ण आढळल्यानंतर पुन्हा सायंकाळी वीज कडाडल्या सारखे झाले आणि नवे १६ रुग्ण समोर आले.यामुळे कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढून ती २२४ पर्यंत पोहचली आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या