💥पुर्णा तालुक्यातील गौर शिवारात गुटखा तस्करांवर चुडावा पोलीसांचा छापा..!💥चुडावा पोलीस स्थानकाचे फौजदार मारोती चव्हाण यांची धाडसी कार्यवाही💥

पूर्णा (दि.२६ जुन) - लाॅकडाऊन काळात पुर्णा तालुक्यात गुटखा तस्करांनी मोठ्या प्रमाणात गुटख्याची विक्री करुन आपली चांदी करुन घेतली आहे.चुडावा पोलीसांच्या पो.उप.नि. मारोती चव्हाण यांनी याकाळात दोन वेळा अवैधरित्या गुटखा विक्री करण्याच्या मुसक्या आवळल्या असुन पुन्हा शनिवारी 27 रोजी गौर शिवारात सकाळी गुटखा तस्करांवर छापा मारुन दोन गुटखा तस्करांसह एक मोटारसायकल व गोवा,राजनिवास, वझीर असा गुटखा जप्त केला आहे.

         पुर्णा शहरातुन गौर येथे गुटखा विक्री करण्याच्या उद्देशाने दोघे जाणार असल्याची माहिती  पो.उप.निरीक्षक मारोती चव्हाण यांना खब-याकडुन मिळाली.या माहीतीवरुन चव्हाण यांनी आपल्या सह पो.काॅ.मारोती चव्हाण,पोकाॅ.शिवाजी बोकारे यांना सोबत घेऊन गौर शिवारात पहाटे पासुन सापळा रचला. सकाळी 8वाजेच्या सुमारास पुर्णा शहराकडुन दोघे एका Mh26an5687 या दुचाकीवरून गौर येथे येत असताना गावाच्या प्रवेश कमानी जवळ छापा घालून पकडले.त्या दोघांना ताब्यात घेऊन विचारपुस केली असता ते दोघे पुर्णा शहरातील रहीवाशी असल्याचे समजते.त्यांच्या जवळ असलेल्या तीन पिशव्यांची तपासणी केली.या पिशव्या मध्ये गोवा,वझिर,राजनिवास कंपनीच्या गुटख्याची 16 ते 17 हजार रुपये किंमतीची पाकीटे आढळून आली.त्या गुटख्यासह मोटारसायकल ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहे.याप्रकरणी अन्न भेसळ प्रशासनास कळवण्यात आले असून सायं उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे समजते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या