💥परभणी तालुक्यातील धर्मापूरीत ३ लाख रुपये माहेरहून आण असे म्हणून विवाहितेचा छळ...!💥सासरच्या जाचाला कंटाळून अखेर दुर्गाने विष पिऊन केली आत्महत्या,पतीसह चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल💥

परभणी (दि.2१ जुन) - मुलबाळ होत नाही, हुंड्यातील पैसे असे 3 लाख रुपये माहेराहून घेऊन ये म्हणून सासरच्या मंडळींनी शारिरीक व मानसिक छळ केला. या छळास कंटाळून दुर्गा गाडगे या विवाहितेने आत्महत्या केली. याप्रकरणी पोलीसांनी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परभणी तालुक्यातील धर्मापूरी येथ्लृील दुर्गा हिचा विवाह सेनगांव तालुक्यातील चिंचखेडा येथ्लृील ज्ञानेश्वर गाडगे याच्यासोबत 2015 साली झाला. विवाहानंतर काही दिवस सुखाचे जाताच दुर्गाचा हुंड्याचे राहिलेले पैसे माहेराहून घेऊन ये म्हणून छळ सुरु झाला. तसेच तिला मारहाण करणे, उपाशीपोटी ठेवणे, मुलबाळ होत नाही म्हणून अपशब्द वापरणे म्हणून पती ज्ञानेश्वर गाडगे, सासू सत्यभामा दादाराव गाडगे, सासरा दादाराव गाडगे, दिर दिनेश गाडगे असे मिळून सातत्याने छळ करीत होते. माहेरी आल्यानंतर दुर्गाने ही बाब वारंवार आई-वडिलांना सांगितली. परंतु माहेरची परिस्थ्लृीती हलाखीची असल्यामुळे दुर्गाच्या सासरच्या मंडळींची अपेक्षा पूर्ण करू शकत नव्हते, ही बाब दुर्गाला ज्ञात होती. तरी देखील सासरच्या मंडळीकडून तिचा छळ सुरुच होता. 17 जून रोजी या छळास कंटाळून दुर्गाने सकाळी विष प्राषन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. विष पिल्याचे लक्षात येताच, तिला प्रथ्लृम जिंतूर येथ्लृील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी तपासून तिला परभणी येथ्लृे नेण्यास सांगितले. त्यामुळे तिला परभणी येथ्लृील शासकीय रुग्णालयात दाखल झाला. तिचा उपचारादरम्यान 18 जून रोजी मृत्यू झाला. याप्रकरणी दुर्गाचे वडील रामा बापुराव गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परभणीत गुन्हा दाखल होऊन तो सेनगांव पोलीसात पाठविण्यात आला. याप्रकरणी पती ज्ञानेश्वर गाडगे, सासू सत्यभामा दादाराव गाडगे, सासरा दादाराव गाडगे, दिर दिनेश गाडगे या चौघांविरुद्ध भादंवि 304 (ब), 306, 498 (अ), 323, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या