💥परभणी येथील वंसतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील पशुसंवर्धन दुग्धशाञ विभागात तोडफोड...!💥एका ई-टेंडरच्या प्रकरणातून काही कंञाटदार व समर्थक यांनी तोडफोड करीत दहशत निर्माण केल्याची माहिती💥

परभणी (२४ जुन) - येथील वंसतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत पशुसंवर्धन दुग्धशाञ विभागात आज बुधवार दि.२४ जुन रोजी दुपारी १२-३० वाजेच्या सुमारास अज्ञात लोकांनी मोठा राडा केला. 
पशुसंवर्धन दुग्धशाञ विभाग कार्यालयातील खुर्च्या,टेबल, फर्निचरसह काचेच्या तावदानांची तोडफोड करीत प्रचंड दहशत निर्माण केली.सदरील तोडफोडीचा प्रकार तब्बल १५ मिनिटे सुरू होता.यावेळी तेथील अधिकारी व कर्मचारी या प्रकाराने हादरले होते.यावेळी कोणीही त्या तोडफोड व दहशत करणाऱ्या निर्माण लोकांना विरोध केला नाही.दरम्यान दुपारी उशीरा मोंढा पोलिसांनी घटना स्थळावर धाव घेतली.
एका ई- टेंडरच्या प्रकरणातून काही कंञाटदार व समर्थक यांनी तो राडा घातल्याची माहिती हाती आली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या