💥परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मागण्या जलद गतीने सोडवा; आ. सुरेश वरपुडकर यांची मागणी...!💥जिल्ह्यात युरिया,डि.ए.पी. व इतर खतांची तीव्र टंचाई झाल्या मुळे शेतकऱ्यांना तात्काळ खत उपलब्ध करून देण्यात यावे💥

परभणी/पाथरी [दि.२१ जुन] :-महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थिती मध्ये काँग्रेस पक्षाच्या सर्व मंत्रिमंडळ सदस्यांची व आमदारांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे बैठक संपन्न झाली.यात जिल्ह्यातील शेतक-यांचे प्रश्न त्वरीत निकाली काढा अशी मागणी आ सुरेशराव वरपुडकर यांनी केली.

या बैठकीत आ.सुरेशराव वरपुडकर यांनी जिल्ह्यातील जनतेला व विशेषतः शेतकऱ्यांना असलेल्या अडचणी संदर्भात मागण्या करून त्या जलद सोडवण्या साठी विनंती केली.

यावेळी परभणी जिल्ह्यात युरिया, डि.ए.पी. व इतर खतांची तीव्र टंचाई झाल्या मुळे शेतकऱ्यांना तात्काळ खत उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी बैठकीस उपस्थित असलेले ना.विश्वजित कदम यांच्या कडे केली.

उपस्थित मंत्रीमहोदयां कडे पाथरी, सोनपेठ, मानवत व परभणी या तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी चे अनुदान मिळाले नाही त्यांना अनुदान देण्याची व शेतकऱ्यांचा शिल्लक राहिलेला कापूस खरेदी करण्याची मागणी केली.

शालेय शिक्षण मंत्री ना.वर्षाताई गायकवाड यांच्याशी संवाद साधताना जि.प. व इतर अनुदानित शाळेतही CBSE व ICSE प्रमाणे अभ्यासक्रम चालू करण्यात यावा असे मत व्यक्त केले.

तसेच सोयाबीन बियाणे उगवण न झाल्याच्या तक्रारी काही प्रमाणात आहेत त्यावरही राज्यसरकारने उपाययोजना करावी अश्या विविध मागण्या आ.सुरेशराव वरपुडकर साहेबांनी बैठकीत मांडल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या