💥परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयातील संसर्गजन्य कक्षात उपचार घेत असलेल्या दोघांचे अहवाल निगेटीव्ह..!



💥अहवाल निगेटीव्ह आलेल्या दोघांना मिळाली रुग्णालयातून सुट्टी तर ४१ कोरोना संशयीत रुग्णांचे स्वॅब निगेटीव्ह💥

परभणी (दि.१० जुन) - येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या संसर्गजन्य कक्षात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव असणाऱ्या दोघांना रुग्णालय प्रशासनाने त्यांचे अहवाल निगेटीव्ह आल्याच्या पार्श्‍वभूमीवर आज बुधवार दि.१० जुन रोजी रुग्णालयातून सुट्टी दिली.

परभणी शहरातील त्रिमुर्ती नगरातील एक व गंगाखेड शहरातील एका रुग्णाचा यात समावेश आहे. दरम्यान नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रयोगशाळेकडून प्राप्त अहवालाप्रमाणे आज बुधवार रोजी ४७ पैकी ४१ संशयित रुग्णांचे स्वॅब निगेटीव्ह आले आहेत. तर ६ संशयितांचे स्वॅब तपासणीस अयोग्य असल्याचा निर्वाळा मिळाला असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने दिली.
दरम्यान, जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोनाबाधित १४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या