💥महाराष्ट्र सायबर विभागाने दिला नागरिकांना सावधानतेचा इशारा...!💥सायबर भामटे लोकांची करत आहेत फसवणूक नागरीकांनो सावधान💥

मुंबई (दि.१६ जुन) - सध्याच्या काळात सायबर भामटे लोकांना फसविण्यासाठी अनेक युक्त्यांचा वापर करत असतात. त्या पासून सावधान रहावे, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात येत आहे.

    फसवणुकीचा एक प्रकार म्हणजे तुम्हाला एक sms येतो कि तुमचे डेबिट कार्ड ब्लॉक झाले आहे व मेसेज मधील नंबरवर कॉल करून तुमची माहिती update करा ,किंवा मेसेज मधील लिंकवर क्लिक करून तुमची माहिती update करा . तुम्ही माहिती दिलीत तर त्याची खात्री करण्यासाठी येणारा otp पण मागितला जातो व तुमच्या खात्यामधील पैसे अनोळखी अकाऊंटमध्ये transfer केले जातात . या सर्व संभाषणाचे एक वैशिष्ट्य म्हणजे हे भामटे कधीही सर्व संभाषणात तुमच्या बँकेचे नाव घेत नाहीत . तुमचे कार्ड ब्लॉक केले आहे याचे sms साधारण पुढील प्रकारचे असतात .
    *नागरिकांना विनंती*
    महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते कि असे मेसेज आले तर सावध राहा . अशा येणाऱ्या sms ने घाबरून त्यात दिलेल्या लिंकवर क्लिक करू नका किंवा फोन करू नका . सर्व नागरिकांनी लक्षात ठेवा कि कुठलीही बँक कोणत्याही खातेदाराची वैयक्तिक माहिती जसे कि CVV क्रमांक ,पिन क्रमांक फोनवर विचारणार नाहीत,तसेच OTP confirmation साठी कॉल करणार नाहीत . जर तुम्हाला असा फोन आला व पलीकडील व्यक्ती त्या संभाषणामध्ये तुमच्या बँकेचे नाव घेत नसेल तर तो फेक कॉल असण्याची शक्यता जास्त आहे .तुम्ही जर एखाद्या अशा प्रकारच्या  गुन्ह्यात फसविले गेले असाल तर कृपया न घाबरता त्याची तक्रार जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये करा व www.cybercrime.gov.in  या संकेत स्थळावर देखील त्याची नोंद करा.
असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात येत आहे.
....................................

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या