💥राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धाडसी नेते तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंची कोरोनावर मात...!💥आज सोमवार दि.२२ जुन रोजी कोरोना मुक्त झाल्याने ना.मुंडेंना रुग्णालयातून मिळाली सुट्टी💥 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- बीड-जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे अखेर सोमवारी (दि.२२) कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.यावेळी त्यांच्यासोबत स्वीय सहाय्यक,दोन वाहन चालक व एक अंगरक्षकही कोरोनामुक्त झाल्याने त्याना सुट्टी देण्यात आली.या संदर्भात स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी यांनी माहिती दिली.

मागील अकरा दिवसांपासून धनंजय मुंडेंना मुंबईच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.सोमवारी (दि.२२) त्यांचा दुसरा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.दरम्यान संघर्षयोद्धा धनंजय मुंडेंनी कोरोनाला पराभूत केल्याने जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.यावेळी श्री.मुंडे यांनी रुग्णालयातून बाहेर पडताना हात उंचावून आणि हात जोडून सर्व डॉक्टर्स नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या