💥गंगाखेड तालुक्यातील पडेगाव येथील गोपीचंदगडावर गुरुवारी गोशाळेचा पायाभरणी शुभारंभ...!


💥खा नवनित राणा, ऊतमराव जानकर यांचे सह मानयवरांची उपस्थिती💥

गंगाखेड- गंगाखेड तालुक्यातील पडेगाव येथील गोपीचंदगडावर गुरुवार दि.11जुन 2020 रोजी गोशाळेचा पायाभरणी शुभारंभ होत आहे. सामाजिक कार्यकर्ते सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या पुढाकारातुन होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन ह-भ-प तुळशीदास महाराज देवईमाय यांच्या हस्ते सकाळी 11-00 वाजता होणार आहे.

लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्याच्या सन्मानार्थ उभारण्यात आलेल्या गोपीचंदगडावर आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बालासाहेब निरस पडेगावकर तर प्रमुख पाहुणे म्हणून अमरावतीच्या खा.नवनित राणा,आ.रवि राणा, रा.का स्टार प्रचारक ऊतमराव जानकर, ईतिहास संशोधक प्रा. डाॅ यशपाल भिगे, प्रसिद्ध जलतज्ञ कांतराव देशमुख झरीकर,माजी जि प उपाध्यक्ष गोपीनाथराव तुडमे,  जि.प सदस्य मारोती बनसोडे पैलवान,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा गंगाखेड विधानसभाध्यक्ष गोविंद यादव,गोविंदराव  देशमुख पेडगाव,  रिपाई नेते डॉ सिद्धार्थ भालेराव, बबनराव मुळे, जि प सदस्य डॉ. सुभाष कदम,राजेश फड, भगवान सानप,अॅड भोजाजी  बनसोडे,नगरसेवक विजय घोरपडे, डाॅ किशन गारोळे, आंनद बनसोडे,पशुधन विकास अधिकारी डाॅ संजय पुरानिक,पशुधन सहायक आयुक्त डाॅ  एस एस फड,डाॅ  देविदास चव्हान, माजी ऊपसभापती सौ. सारीकाताई शेंडगे,माजी सरपंच नागनाथ


निरस, सरपंच सचिन निरस प्रसिध व्यापारी संदिप महाजन, वाघलगावच्या  सरपच सौ.सिमाताई घनवटे,अंकुश भारतीय,रामेश्वर भोसले पाटील, मुंजाभाऊ लांडे, ,रविकात हारकळ,  पसन्नजित मस्के,उपसरपंच शिवाजी बोबडे  हे उपस्थित राहणार आहेत.  .कोरोना महामारी च्या काळात  सरकारी नियमांचे,सोशल  डिस्टशिंगचे पालन करीत होणाऱ्या या छोटेखानी कार्यक्रमात  गोशाळेचा पायाभरणी शुभारंभ होत आहे. यावेळी पशुवैद्यक विभागातर्फे परिसरातील पशु पालकांसाठी  मान्सून पूर्व रोगप्रतिबंधक लसीकरण  शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार, धनगर  साम्राज्य सेनेचे संस्थापक सखाराम बोबडे पडेगावकर  यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुकुंद बोबडे, संभाजी बोबडे, दिगंबर बोबडे सह  गोपीचंदगड परिवार व धनगर साम्राज्य सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. कोरोना च्या  काळात या कार्यक्रमास उपस्थित न राहता गोपीचंदगड व सखाराम बोबडे  या फेसबुक पेजवर होणार्या live  कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या