💥नांदेड येथील डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात प्रचंड अस्वच्छता,जिल्हा आरोग्य विभाग गाड झोपेत..!💥रुग्णालयासह परिसराला अक्षरशः उकंड्याचे स्वरूप रुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्ष💥

नांदेड(दि.06 जुन)/येथील डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयातील गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून कोरोना व्हायरस या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आरोग्य यंत्रणेला सतर्कचा इशारा दिला असतांना कोरोना व्हायरस या जागतिक महामारी संदर्भात जिल्हा आरोग्य प्रशासन व जिल्हा शासकीय रुग्नालय प्रशासन म्हणावे तितके सतर्क नसल्याचे निदर्शनास येत असून रुग्नालयात सर्वत्र पसरलेली अस्वच्छता रुग्णांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरण्याची लक्षण दिसू लागली आहे.

जिल्हा रुग्णालयातील कारभार सुधारावा व रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांवर योग्य उपचार व्हावा याकरिता आरोग्य मंत्रालयाने तब्बल १२ कोटी रुपयांचा नाधी उपलब्ध करून दिल्यानंतर ही रुग्णांची हेळसांड तर थांबायचे नाव घेतच नाहीय उलट रुग्णालयातील अस्वस्छता ही रुग्णांच्या आरोग्याचा घात करण्याची लक्षणे दिसू लागली असून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भोसीकर यांनी शासकीय रुग्णालयातील या गलथान व बेजवाबदार कारभाराकडे तात्काळ लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय  रुग्णालयातील स्त्री रुग्न विभागातील वार्ड क्रमांक ३ च्या अस्वच्छ गलथान परिस्थितीचे प्रत्यक्ष चित्रण येथील सामाजिक कार्यकर्ते सरदार लखनसिंघ राठौड यांनी केले असून त्यांनी केलेल्या चित्रीकरणातून परिस्थितीची पाहणी केली असता अक्षरशः मन व्यथीत होत आहे.स.लखनसिंघ यांनी शासकीय रुग्णालयाचे उपजिल्हा शल्य चिकित्सक डॉ.चव्हान यांना  या गंभीर परिस्थिती संदर्भात काही प्रश्न विचारले असता त्यांच्याकडे या प्रश्नां संदर्भात काहीच उत्तर नसल्याचे निदर्शनास आले. नांदेड जिल्ह्यात कोरोना विषूणूंचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत असतांना जिल्ह्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयातील हा अत्यंत गलथान कारभार जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या निश्क्रियता उघड करणाराच म्हणावा लागेल.
राज्यातील कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जनसामान्यांत आरोग्य यंत्रणेत राबणाऱ्यांना कोविड-१९ योध्दा म्हणून गौरवण्यात येत असतांना व वृत्तपत्रांत आरोग्य अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना सन्मानाने योध्द्याची उपाधी दिली जात असतांना मात्र डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय जिल्हा रुग्णालयातील अत्यंत भयावह झालेली परिस्थिती जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची पोलखोलणारीच म्हणावी लागेल.राज्याचे आरोग्यमंत्री मा.ना.राजेश टोंपे स्वच्छतेच्या नावावर मिडिया समोर येवून सॅनीटायझर करतांना निदर्शनास येत असतांना मात्र नांदेड जिल्ह्यातील डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील प्रचंड अस्वच्छता रुग्णांच्या आरोग्याशी खेळ खेळतांना पाहावयास मिळत आहे.....   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या