💥पुर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांना बोगस बीयाणे देऊन फसवणूक करणाऱ्या बियाणे कंपन्यावर गुन्हे दाखल करा...!💥शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी कृषी अधिकाऱ्यांकडे केली मागणी💥

पुर्णा (दि.२४ जुन) - खरीप पेरणीसाठी उच्च प्रतिचे नावाजलेले बीयाणे असल्याचे भासवून बोगस बीयाणे शेतकऱ्यांच्या माथी मारुन फसवणूक करणाऱ्या बियाणे कंपन्यांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी कृषी अधिकाऱ्यांकडे केली आहे.

          खरीप हंगाम २०२० ची सुरुवात झाली असुन बहुतांशी जिल्ह्यासह तालुक्यातील शेतकरी बांधवांना सोयाबीन पीकाची पेरणी केली आहे.परंतु अनेक शेतकऱ्यांनी पेरलेले उच्च प्रतिचे सोयाबीन बीयाणे उगवलेच नसल्याचा धक्कादायक प्रकार पुर्णा तालुक्यातील अनेक गावांमध्ये उघडकीस आला आहे तश्या  तक्रारी शेतकऱ्यांच्या प्राप्त झाल्या आहेत.त्यामुळे शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल भाऊ कदम यांनी शेतकऱ्यांसमवेत मंगळवारी २३ रोजी पुर्णा तालुका कुषी अधिकारी तांबिले यांची प्रत्यक्ष भेट घेऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन न उगवलेल्या सोयाबीनच्या बोगस बीयाण्याचे पंचनामे करून सदरील बीयाणे कंपनीविरुद्ध कायदेशीर कारवाई करत गुन्हे दाखल करावे,तसेच महामंडळ व शासकीय अनुदानित बीयाण्यांचे तातडीने वाटप सुरू करावे अशी मागणी कदम यांनी केली.यावेळी सरपंच गजानन शिराळे,मंचक इंगोले गोविद इंगोले राम भालेराव आदींची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या