💥वृक्षारोपण व संवर्धन काळाची गरज-- डॉ. वंदना वाहुळ

     
 💥ध.टाकळीत गोदावरी शिक्षण संस्था संचलित राष्ट्रमाता इंदिरा गांधी स्मारक हायस्कूल येथे वृक्षारोपण संपन्न💥

पुर्णा (दि.२३ जुन) - राष्ट्रमाता इंदिरा गांधी स्मारक हायस्कूल धनगर टाकळी या ठिकाणी शासनाच्या डेंस फॉरेस्ट उपक्रमा अंतर्गत आज दिनांक 22-06-2020 रोजी 400 रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. गोदावरी शिक्षण संस्था संचलित राष्ट्रमाता इंदिरा गांधी स्मारक हायस्कूलचे अध्यक्ष रामकिशन रौंदळे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा शिक्षणाधिकारी डॉ वंदना वाहुळ यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शना खाली कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सरपंच शिवाजी साखरे, उपसरपंच शेरखॉं पठाण, शाळेचे सचिव दशरथ साखरे,शिक्षण विस्तार अधिकारी मोरे, शिक्षण निरीक्षक निरपणे, ग्रामविस्तार अधिकारी घिरडकर, संस्थेचे पदाधिकारी सखाराम साखरे, पिराजी साखरे, माणिकराव रौंदळे,गुलाब खॉं, पठाण, भगवान पाटील, रामदास पवार यांची उपस्थिती होती 
--------------------------------------------------------------------
[राष्ट्रमाता इंदिरा गांधी स्मारक हायस्कूल, धनगर टाकळी ता. पुर्णा जिल्हा परभणी येथे डेंस फॉरेस्ट प्रकल्पा अंतर्गत वृक्षारोपण करतांना जिल्हा शिक्षणाअधिकारी डॉ. वंदना वाहुळ, संस्थेचे अध्यक्ष रामकिशन रौंदळे, सरपंच शिवाजी साखरे, उपसरपंच शेरखॉं पठाण, संस्थेचे सचिव दशरथ साखरे, ग्रामविकास अधिकारी गिरडकर, मुख्याध्यापक वा. दे. पाटील व संस्थेचे पदाधिकारी.]
-------------------------------------------------------------
संस्थेचे अध्यक्ष रामकिशन रौंदळे यांनी डेंस फॉरेस्ट या शासनाच्या आभियानाची माहिती दिली व शाळा राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. आपल्या प्रमुख मार्गदर्शनात डॉ. वंदना वाहुळ यांनी वृक्षांचे महत्त्व विषद करतांना सांगितले, झाडे लावणे व त्याचे संगोपन करणे हे पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी, निरोगी जिवनासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. वृक्ष संवर्धन काळाची गरज आहे. शाळेच्या विस्तीर्ण जागेमध्ये मोठया संख्येने झाडे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. डेंस फॉरेस्ट ही संकल्पना समजावून सांगितली. शाळेच्या वतीने सर्व मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. शाळेमधुन शिक्षण घेतलेल्या व डॉक्टर, इंजिनिअर झालेल्या डॉ. शहनाज पठाण, मिरा साखरे, डॉ. स्वाती गोरखनाथ साखरे यांचा डॉ. वंदना वाहुळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डॉ. वंदना वाहुळ व शिक्षण विभागाच्या पथकाने शाळेच्या वर्गांची पाहणी केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाच्या खबरदारी व फिसीकल डिस्टंसचे पालन या विषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जेष्ठ शिक्षक श्रीकांत हिवाळे यांनी तर आर. आय. शेख यांनी सुत्रसंचलन केले. आभार डी. सी. डुकरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक वा. दे. पाटील, शिक्षक बेंद्रे, महाजन, कुळकर्णी, शेख, साखरे, डुकरे,पाटील, दुधाटे, शेळके व सेवक वर्गाने परिश्रम घेतले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या