💥पुर्णा शहरातील सिद्धार्थ नगर भागातील रेल्वेच्या इंग्रजी माध्यम शाळेत चोरी...!💥शाळेच्या कार्यालयाचे कुलूप तोडून एक १० हजार रुपये किंमतीचे संकणकासहा छताचा पंखा चोरट्यांनी पळवला💥

पूर्णा (दि.२५ जुन) येथिल रेल्वे शाळेतील संगणक,पंखा चोरट्यांनी पळवल्याची घटना मंगळवारी २३ रोजी घडली आहे. याप्रकरणी पुर्णा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

       पुर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील सिद्धार्थ नगर भागातील रेल्वेची इंग्रजी माध्यमाची शाळा आहे.सध्या लाॅकडाऊनमुळे शाळा बंद आहेत.मंगळवारी दुपारी २ नंतर काही शिक्षक शाळा बंद करुन घरी गेल्यावर शाळेत कोणी नसल्याचा फायदा घेऊन शाळेच्या कंपाऊंड वॉल मध्ये प्रवेश करुन या शाळेच्या कार्यालयातील दरवाजाचे कुलूप तोडून एक १० हजार रुपये किंमतीचे संकणक, १ हजार रुपयांचा छताचा पंखा  चोरट्यांनी पळवल्याची घटना बुधवारी २४ रोजी  उघडकीस आली. यावरुन शाळेचे प्राचार्य राम गणपत धबाले यांनी पुर्णा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञातां विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास सय्यद मोईन करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या