💥परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात आज ८ कोरोना संशयित दाखल....!



💥संक्रमीत कक्षात अवघे ३ रुग्णच,एकूण संशयितांची संख्या आता २५५२ झाली आहे💥

परभणी ( दि.१८ जुन) - येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील संक्रमीत कक्षातील कोरोनाबाधित पाच रुग्णांपैकी बऱ्या झालेल्या दोघा रग्णांना प्रशासनाने काल बुधवार दि.१७ रोरी सर्व सोपस्कार पूर्ण करीत डिस्चार्ज दिला. त्यामुळे संक्रमीत कक्षात अवघे तीनच रुग्ण उपचार घेत असून आज गुरूवार दि.१८ जुन रोजी शासकीय रुग्णालयात नव्याने ८ संशयित दाखल झाले आहेत. 


जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे  गुरूवारी नव्याने ८ संशयित दाखल झाले असून एकूण संशयितांची संख्या २५५२ झाली आहे. गुरूवारपर्यंत घेण्यात आलेल्या एकूण स्वॅबची संख्या २७४८ झाली असून एकूण २५१० जणांचे स्वॅब निगेटीव्ह आले असून एकूण प्रलंबीत स्वॅबची संख्या अवघी १७ राहिली आहे. आतापर्यंत ८० अनिर्णायक ४७ स्वॅब एकूण संशयितांची संख्या २५५२ झाली आहे.आवश्यक नसल्याचा अहवाल  नांदेड प्रयोगशाळेद्वारे  प्राप्त झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९४ रुग्णांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला.८८ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने  जिल्हा रुग्णालय प्रशासनाने त्या रुग्णांना डिस्चार्ज दिला. आता रुग्णालयात अवघे तीन कोरोनाबाधित रूग्ण उपचार घेत आहेत. त्यांचीही प्रकृती स्थिर आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या