💥राज्यातील कारागृहही आता कोरोना विषाणूं पासून सुरक्षित नाही,कोरोना विषाणूंचा हर्सूल जेल मध्ये प्रवेश...!💥औरंगाबाद येथील हर्सूल कारागृह मधील १२ कर्मचाऱ्यांसह २ अधिकारी कोरोना बाधीत💥

औरंगाबाद (दि.१० जुन) राज्यातील जेलही आता कोरोना विषाणूं पासून सुरक्षित राहिलेली नाहीत कारण कोरोना विषाणूंनी आता आपला मोर्चा राज्यातील जेल (कारागृह) कडे वळवल्याचे निदर्शनास येत असून मराठवाड्याची राजधानी समजल्या जाणाऱ्या औरंगाबाद येथील  हर्सूल जेलमध्ये १२ कर्मचाऱ्यांसह  २ अधिकारी कोरोनाबाधित झाल्याचे वृत्त नुकतेच हाती आले आहे.

औरंगाबाद मध्यवर्ती कारागृह हर्सूल येथे २९ कैदी कोरोना पॉझिटिव्ह आले होते आता कारागृहातील १२ कर्मचारी व  अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती कारागृह अधिक्षकांनी दिली आहे.कारागृहाबाहेर दोन बंगले व रेस्ट हाऊस मधील दोन सुट येथे सर्वांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. त्यांच्यावर कोविड-१९ टास्कफोर्स, मनपा,वैद्यकीय अधिकारी यांचे मार्फत उपचार सुरु आहे. काल मंगळवार दि.०९ जुन २०२० रोजी सायं.०४-०० वाजेपासून लॉकडाऊन उघडण्यात येईल असे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या