💥नांदेड जिल्ह्यात आज पुन्हा 6 कोरोना रुग्ण वाढले...!



💥जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या 262 एव्हढी झाली आहे💥

नांदेड (दि 15 जुन) नांदेड जिल्ह्यात सोमवार दि 15 जून 2020 रोजी प्राप्त झालेल्या एकूण 56 अहवालांपैकी 41 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले,  त्यात 06 अहवाल हे पॉसिटीव्ह प्राप्त झाले आहेत, त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या 262 एव्हढी झाली आहे. 

✔️आज प्राप्त झालेले रुग्ण हे खालील भागातील आहेत :
☑️बरकतपुरा,  नांदेड शहर  - एक पुरुष रुग्ण वय - 32,

✔️विठ्ठल मंदिर, ता. मुखेड,जि.नांदेड   5 रुग्ण आहेत
☑️यात 3 पुरुष रुग्ण,  वय वर्ष अनुक्रमे - 47, 52, व 62.
☑️आणि 2 स्त्री रुग्ण,   वय वर्ष  - 52 व 55 आहेत.
असे एकूण 6 रुग्ण आहेत.

आतापर्यंत 262 रुग्णांपैकी 177 रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे व 13 रुग्णांनी उपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित 72 रुग्णांवर उपचार चालू असून त्यातील 3 रुग्णांची प्रकृती गंभीर स्वरूपाची आहे.
या रुग्णांमध्ये एक स्त्री रुग्ण ज्यांचे वय वर्ष 52 आणि 2 पुरुष ज्यांची वय वर्ष  52 व 54 आहेत.  तर 5 रुग्णांना उपचारस्तव औरंगाबाद येथे संदर्भित करण्यात आले आहे.

✔️नांदेड जिल्ह्यातील एकूण कोरोना अहवाल.

☑️ आज दिवसभरात 5 पॉझिटिव रुग्णांची भर.
☑️ एकूण रुग्ण संख्या 262 वर.
☑️ आत्तापर्यंत 177 बरे होऊन घरी
☑️ 2 पॉसिटीव्ह रुग्ण फरार.
☑️13 कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू.
☑️72 रुग्णांवर उपचार सुरू.
☑️ 1 महिला 2 पुरुष रुग्णाची प्रकृती चिंताजनक
☑️ 5 रुग्ण उपचारास्तव औरंगाबाद येथे संदर्भीत.
#Playmarathinews

सोमवार  दि 15 जून 2020 रोजी 346 स्वॉब तपासणीसाठी पटविण्यात आलेले आहेत त्यांचे अहवाल उद्या संध्याकाळ पर्यंत प्राप्त होतील असेल नांदेड आरोग्य विभागाच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केलेले आहे.

कोरोना विषाणू संसर्गाबाबत नांदेड जिल्ह्यातील माहिती
दि: 15/06/2020 वेळ 05.00 PM

• आत्तापर्यंत एकूण संशयित - 5233
• एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या- 4800
• क्वारंटाईन कालावधी पूर्ण - 2705
• अजून निरीक्षणाखाली असलेले - 243
• पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये - 175
• घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले - 4625
•   आज घेतलेले नमुने - 279
• एकुण नमुने तपासणी- 5298
• एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- 262
• पैकी निगेटीव्ह - 4400
• नमुने तपासणी अहवाल बाकी- 346
• नाकारण्यात आलेले नमुने - 83
• अनिर्णित अहवाल – 200
•       कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले - 177
• कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या – 13
• जिल्ह्यात  बाहेरून आलेले एकूण प्रवासी 145323 राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.

✅️ नांदेड आरोग्य विभागाचे महत्त्वाचे आवाहन!

दरम्यान जनतेने घाबरुन न जाता गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून सतत हात धुणे व मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे प्रत्येक व्यक्तींने आपल्या वर्तनात बदल करुन स्वत: सुरक्षितेची अधिक काळजी घेतली पाहिजे. रोजच्या जीवनात आपण ज्या काही वस्तू बाहेरुन आणतो त्याची योग्य ती स्वच्छता केली पाहिजे. भाजीपाला घेतल्यास तो स्वच्छ करुन किमान 12 तास न वापरता स्वच्छ जागी ठेवून आपल्या आहाराप्रतीही अधिक सजग राहून नागरिकांनी दक्षाता घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
#Playmarathinews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या