💥परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात नव्याने 59 कोरोना संशयित दाखल....!



💥जिल्ह्यात कोरोना संशयितांची संख्या 2403, प्रलंबीत अहवाल 167💥

परभणी / -कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात आज मंगळवार दि.02 जुन रोजी सायं.06-00 वाजेपर्यंत एकूण 59 संशयीत दाखल झाले असून संशयितांची संख्या 2403 पर्यंत पोचली आहे. 167 संशयितांच्या स्वॅबचे अहवाल प्रलंबीत आहेत.

एकूण 2531 पैकी 2176 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. आतापर्यंत एकूण 86 जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. तर 71 संशयितांचे अहवाल अनिर्णायक आहेत. 31 जणांचे स्वॅब तपासणीसाठी आवश्यक नसल्याचाही अहवाल मिळाला आहे. एकूण 167 स्वॅबचे अहवाल प्रलंबीत आले आहेत.जिल्हा शासकीय रुग्णालयातून मंगळवारी एकूण 30 जणांचे स्वॅब नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. जिल्हा शासकीय रूग्णालयात मंगळवारपर्यंत विलगिकरण कक्षात 764, रुग्णालयातील संसर्गजन्य कक्षात 59 जण आहेत. विलगिकरणाचा कालावधी पूर्ण झालेले 1580 जण आहेत. आतापर्यंत असलेल्या एकूण 86 पॉझीटीव्ह पैकी 25 जण बरे होवून घरी गेले आहेत. 59 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या