💥परभणी जिल्ह्यातील 24 कोरोना रुग्ण ठणठणीत कोरोनामुक्त....!



💥जिल्हा शासकीय रुग्णालयात २३४४ संशयितांची नोंद💥

 परभणी, दि.1 :- परभणी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल असलेले एकुण २४ कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचे स्वॅब निगेटिव्ह आल्याने व त्यांच्यात कसलेही कोरोनाची लक्षणे आढळून न आल्याने व त्यांची प्रकृती ठणठणीत कोरोनामुक्त झाली असल्याने राज्यस्तरावरुन प्राप्त मार्गदर्शक सुचनांनुसार संबधितांना रुग्णालयातुन सुट्टी देण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

       कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे होण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली कोव्हिड आय.सी.यु चे नोडल ऑफिसर डॉ.दुर्गादास पांडे व कोव्हिड डि.सी.एच. सेंटर , आय.टी.आय येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ . जयश्री यादव , कार्यरत वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले .       
            जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनमध्ये सुट दिलेली असली तरी नागरीकांनी सुट दिलेल्या कालावधीत अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडावे , सोशल डिस्टन्सचे पालन करावे, मास्क वापरावा , सार्वजनिक ठिकाणी थुंकु नये , सर्दी , ताप , खोकला , घसा खवखवणे व श्वास घेण्यास त्रास आदी विषयक कोणत्याही व्यक्तीची तक्रार असल्यास , घाबरून न जाता , घरी न थांबता तातडीने नजीकच्या रुग्णालयात वैद्यकीय तज्ञाचा सल्ला घ्यावा. असे आवाहन जिल्हा आपत्ती प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. तसेच सोमवार दि.१ जुन २०२० रोजी कोरोना विषाणु संदर्भात सायंकाळी ७ वाजेपर्यंत जिल्हा रुग्णालय परभणी येथे पूर्वीचे २ हजार ३३१ व आज रोजी दाखल झालेले १३ असे एकुण २ हजार ३४४ संशयीत व्यक्तींची नोंद झाली आहे...
                

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या