💥परभणीत साकला प्‍लॉट परिसरात आढळला सहावा कोरोना रुग्ण....!💥संबंधित रुग्नाचा स्वॅब प्रयोग शाळेकडे पाठवले होते. आज पहाटे त्या स्वॅबचा अहवाल प्राप्त झाला💥

परभणी, दि.19 :-  परभणी शहरातील साकला  प्लाट येथील एक रुग्णा चा अहवाल मंगलवार दि .19मे २०२० रोजी  सकाळी प्राप्त झालेल्या स्वॅब अहवालानुसार कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

गंगाखेड रस्त्यावरील साखला प्लाॅट भागात कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आलेला यूवक हा पुण्यातील फातेमानगर भागातून सतरा मे रोजी परभणीत परला होता. जिल्हा शासकीय रुग्णालयात दोन दिवसांपूर्वीच तक्रार घेवून तो दाखल झाला.वैद्यकिय अधिका-यांनी त्यांचे स्वॅब घेवून नांदेड प्रयोगशाळेकडे पाठवले होते. आज पहाटे त्या स्वॅबचा अहवाल प्राप्त झाला.युवक पाॅझिटिव्ह आढळला. दरम्यान या युवकाने आपण वाहनावरून आल्याचे म्हटले,पण सोबत कोण होतं,तो कोणाच्या संपर्कात आल्याचे त्याने सांगितले नाही.पोलिस,आरोग्य अधिकारी माहिती घेत आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या