💥बिड जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ आणखी ६ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले...!💥जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ४७ त्यातील एक कोरोनामुक्त तर एकाचा मृत्यू💥 

बीड :  जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत रविवारी पुन्हा भर पडली. रात्री प्राप्त अहवालानुसार आणखी ६ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

  या रुग्णांमध्ये बीड तालुक्यातील साखरे बोरगाव येथील एक पुरुष, एक महिला आणि एका मुलीचा समावेश आहे. तसेच पाटोदा येथे एक पुरुष तर वडवणीत एक पुरुष व एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या. सर्व सहा जण हे मुंबई येथून आलेले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ४७ आहे. त्यातील एक कोरोनामुक्त तर एकाचा मृत्यू झाला आहे. ६ पुण्याला पाठविले असून 39 जणांवर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या