💥औरंगाबाद ते जालना दरम्यान मालगाडीच्या धक्क्याने अंदाजे १३ ते १५ परप्रांतीय मजुरांचा दुर्दैवी मृत्यू..!💥परप्रांतीय मजुरांचा लोहमार्गाने घर परतीचा पायी प्रवास अखेरचा प्रवास ठरला💥

औरंगाबाद/कोरोना व्हायरस या जागतिक महामारीमुळे देशासह संपूर्ण राज्यात लॉक-डाऊन संचारबंदीसह रेल्वेसह सर्वच प्रवावी वाहतूक बंद असल्याने असंख्य राज्यातील असंख्य कामगारांसह परप्रांतीय कामगार ही अडकून पडल्याने कोणत्याही परिस्थितीत आपले घर गाठायचे असे ठरवून असंख्य कामगार पायी प्रवासासाठी लोहमार्गाचा अवलंब करीत असल्याचे निदर्शनास येत असून हा लोहमार्गावरील पायदळी प्रवास किती घातक असतो यांचा प्रत्यय आज दि.०८ में रोजी आला असून सकाळी भल्या पहाटेच्या सुमारास
औरंगाबाद-जालना रेल्वे स्थानकाच्या दरम्यान करमाड ते बदनापूर रेल्वे किमी १३८ ते १३९ या ठिकाणी उडानपुलाच्या जवळ अंदाजे १३ ते १५ परप्रांतीय मजूर धावत्यारे ल्वेखाली बहुतेक मालगाडी चा धक्का बसल्याने जागीच ठार झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून रेल्वे पोलीस,रेल्वे सुरक्षा बल,ग्रामीण पोलीस वरिष्ठ अधिकारी,पोलीस निरीक्षक व कर्मचारी घटना स्थळ कडे रवाना झाले आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या