💥परभणी जिल्हा रेड झोन मध्ये; जिल्ह्यात आज ९ कोरोना बाधीतांची नोंद जिल्ह्यात एकून १६ रुग्न...!💥पुर्णा तालुक्यातील माटेगावात १ तर गेगाखेड तालुक्यात आढळले २ कोरोना बाधीत रुग्न💥

परभणी/जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर व जिल्ह्याचे कर्तव्यकठोर जिल्हा पोलीस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय तसेच जिल्हा शल्य चिकीस्तक डॉ.बाळासाहेब नागरगोजे हे अधिकारी जिल्ह्यातील जनतेला कोरोना व्हायरस या जागतिक महामारी पासून वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असतांना मात्र जिल्ह्यातील सोनपेठ-गंगाखेड-पुर्णा आदी तालुक्यासह अन्य तालुक्यातील स्थानिक आरोग्य प्रशासनासह तहसिल प्रशासन व पोलीस प्रशासन या कोरोना व्हायरस (कोविड-१९) जागतिक महामारी पासून आपल्या परिसरातील नागरिकांना वाचवण्यासाठी गंभीर नसल्यामुळे संपूर्ण जिल्हाच रेड झोन मध्ये समावेश होण्याच्या मार्गावर असल्याचे निदर्शनास येत असून
परभणी,सोनपेठ तालुक्यांच्या पाठोपाठ आज बुधवार दि.२०मे रोजी पुर्णा तालुक्यातील येथील १ व्यक्तीचा तर गंगाखेड तालुक्यातील २ तसेच सोनपेठ तालुक्यातील शेळगाव(महाविष्णु) येथील मुंबईहून परतलेल्या त्या महिले बरोबर प्रवास केलेल्या अन्य ६ व्यक्तींचा स्वॅब कोरोना पॉझीटीव्ह आढळून आल्याची अत्यंत धक्कादायक माहिती आज बुधवार रोजी सायंकाळी हाती आली असून जिल्हा प्रशासनाने त्यास दुजोरा दिला आहे. दरम्यान,आजच्या या अहवालाने शासकीय यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे.
पुर्णा तालुका पातळीवरील आरोग्य यंत्रणेसह तहसिल प्रशासन व पोलीस प्रशासन कोरोना विषाणू संसर्ग रोखण्या संदर्भात यत्किंचितही गंभीर नसल्याचे दिसत असून तालुक्यात छुप्या मार्गाचा अवलंब करून नासिक-पुणे-मुंबई-नांदेड-हिंगोली आदी रेड झोन जिल्हांतून घुसखोरीसह अधिकृत परवाना काढून प्रवेश करणाऱ्यांची संख्या मोठ्या  प्रमाणात वाढतांना दिसत असून रेड झोन जिल्ह्यातून प्रवास करून तालुक्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीला आरोग्य विभागाकडून कोरोंटाईन/होम कोरोंटाईन करून त्यातील बऱ्याच लोकाचा स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात येत नसल्याने संपूर्ण तालुका कोरोना बाधीत होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
तालुक्यातील माटेगाव येथे रेड झोन जिल्ह्यातून घुसखोरी केलेल्या एका व्यक्तीला शासकीय ग्रामीण रुग्नालय पुर्णा येथे दि.१५ मे २०२० रोजी कोरोना तपासणीसाठी दुपारी ०२-३० ते ०३-०० वाजेच्या दरम्यान व्हेन मधून आणते वेळी पो.नि.गोवर्धन भुमे यांनी त्याच्या सोबत व्हेन मधे दोन कर्मचाऱ्यांना बसण्याचे आदेश दिले होते.यानंतर त्या व्यक्तीला कोरोंटाईन करून शहरा बाहेरील पांगरारोड वरील शासकीय मागासवर्गीय वस्तीगृहात १४ दिवस कोरोंटाईन कक्षात ठेवण्यात आले.त्याचा कोरोना तपासणीचा अहवाल कोरोना पॉझेटीव्ह म्हणून आज नुकताच प्राप्त झाला असून या अहवाला नंतर तालुक्यात सर्वत्र खळबळ माजली असून मागासवर्गीय वस्तीगृहात त्या व्यक्ती सोबत विलगीकरण झालेल्या अर्थात वास्तव्य करणाऱ्या लोकांचीही कोरोना तपासणी होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत असून पुर्णा तालुक्यात कोरोना व्हायरस कोविड-१९ या महामारी संदर्भात पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले या आरोग्य तपासणी नंतर पुर्णा पोलीस स्थानकातील एक अधिकारी व दोन कर्मचाऱ्यांना १४ दिवसांसाठी होम कोरोंटाईन करण्यात आले होते परंतु संबंधित अधिकारी व दोन कर्मचारी आज पुन्हा कर्तव्यावर रुजू झाल्याने चर्चेला उद्यान आले असून तालुका प्रशासनाचा निष्काळजी पणा तालुक्यासाठी अत्यंत धोकादायक ठरण्याची शक्यता व्यक्त होतांना निदर्शनास रायेत आहे.
परभणी जिल्ह्यातील जनतेला कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भाव होता कामा नयें याकरिता कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर,आपल्या कर्तव्याशी सतत कर्तव्यनिष्ठ असलेले जिल्हा पोलीस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय जिल्हा शल्य चिकीस्तक डॉ.बाळासाहेब नागरगोजे अहोरात्र स्वतःचा जिव धोक्यात घालून कठोर परिश्रम करीत असतांना मात्र पुर्णा तालुक्यातील आरोग्य विभाग,तहसिल प्रशासन,पोलीस प्रशासन म्हणावे तितके गंभीर नसल्याने संपूर्ण तालुका पाहता पाहता कोरोना बाधीत होण्याची शक्यता वर्तवली जात असून हिंगोली-नांदेड आदी रेड झोन जिल्ह्यातून छुप्या मार्गाने पुर्णा तालुक्यात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची संख्या वाढतांना दिसत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या