💥......त्यांची चूल तेवत राहावी यासाठी पुढे आला हा मसीहा ; शेतातील माल विक्रीपूर्वीच केला वाटप..!
💥दुसऱ्यांच्या व्यथा मांडणारा घटकच  होता उपेक्षीत,प्रा.नंदलाल पवारांच्या दातृत्वाने पाणावले त्यांचे डोळे💥


मंगरुळपीर(फुलचंद भगत) :- साहेब आमची समस्या मांडा, आम्हाला न्याय द्या अशा गर्तेत सतत वंचित व उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी तत्पर असलेला घटकही हल्ली हवालदिल झाला आहे.  कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे अनेक घटकांना मोठा फटका बसला आहे समाजमनाच्या ह्या व्यथा मांडणारा घटकही उपेक्षित झाला आहे अडचणीची घडी लक्षात घेऊन त्यांची चूल पेटती राहावी या सहानुभूतीतून राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्रा. नंदलाल पवार यांनी शहरातील पत्रकारांना गहू,भाजीपाला व धान्याचे वाटप करून या घटकाला आधार दिला आहे.

लोकशाही व्यवस्थेत प्रसार माध्यम हा चौथा आधारस्तंभ आहे. शासन, प्रशासन व जनतेतील दुवा म्हणून प्रसार माध्यमे काम करतात सर्व बाजूंनी व्यथित झाल्यावर कुठला आधार उरत असेल तर तो प्रसारमाध्यमांचा समाजव्यवस्थेत एवढं या क्षेत्राच महत्व आहे! साहेब आमची तेवढी बातमी फोटोसहित ठराविक पानावर ठळक मथळ्यात चांगली लावावी, पण उद्या आलीच पाहिजे. याकरिता आग्रह समाजातील घटक धरतात. पण सध्या  जाहीरात नको. तुम्हाला दिली की, सगळेच मागतात. असे सल्ले त्यांना ऐकावे लागतात. वास्तविक पत्रकारांना कोणताही पगार व मानधन दिले जात नाही आजच्या काळात तर इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या वाढत्या प्रसारामुळे मुद्रित प्रसार माध्यमे व त्यात काम करणारे घटक प्रचंड अडचणीत आले आहे. कोणताच पगार, मानधन नसतांना केवळ घरच खाऊन मामाच्या बकऱ्या चारायला नेणे अशी बिचाऱ्या पत्रकारांची अवस्था झाली आहे तरीही त्यांनी समाज सेवेचा पिंड सोडलेला नाही. अडचणीच्या काळात दुर्दैवाने आपल्या हितचिंतकांना एक माणूस म्हणून पत्रकारांची कधीच आठवण होताना दिसत नाही हे पत्रिकारितेच दुर्दैव म्हणावं लागेल. पत्रकार माणूस नाही का, त्याला स्वत:चा परिवार नाहीये ? पत्रकार हा फक्त बातमी देण्यापुर्ताच असतो का, सध्या कोरोनाचा पादुर्भाव वाढल्यामुळे सगळीकडे लाॅकडाऊन आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून प्रत्येकजण जिवाच्या भीतीने घरातच बसला आहे. त्यांचीच काळजी घेण्यासाठी पोलिस, डाॅक्टर, आरोग्य कर्मचारी यांच्याप्रमाणे पत्रकार बांधव सामाजिक बांधिलकी म्हणून स्वत;चा जीव धोक्यात घालून रस्त्यावर आहेत. सर्व दैनंदिन घडामोडी वाचकांपर्यंत पोहचवीणे, समाजातील अडचणी माध्यमातून शासन व प्रशासनापुढे मांडण्यासाठी पत्रकार सतत धडपडत असतात.स्वतः उपाशी असूनही दुसऱ्यांना कसे मिळेल यावरच त्यांचा भर असतो. अशा कठीण परिस्थितीत कर्तव्य बजावणारे पत्रकार बांधव, अन् त्यांचा परिवार कसा आहे. काही अडचण तर नाही ना हेही कुणी विचारायला तयार नसते नेमकी ही अडचण जाणून व पत्रकारांची आर्थिक परिस्थिती बेताची असून अनेकदा त्यांना उदरनिर्वाहासाठी अवलंबून राहावे लागते याची जाण असल्याने पत्रकारांच्या संघटनेचे पुढारी प्रा. नंदलाल पवार यांनी आपल्या शेतातील गहू बाजारात विक्रीस नेण्यापूर्वी शहरातील गरजू पत्रकारांना एक एकट्याने बोलवून प्रत्येकास 50 किलो गहू व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. लॉक डाऊन सुरू झाल्या पासूनच नाही तर ते वर्षभर ते पत्रकारांच्या  सुख-दुखातही ते धावून जातात. सगळे रस्ते बंद झाले तेव्हा या सर्वांना आठवणारा एकमेव रस्ता म्हणजे प्रा.नंदलाल पवार हे समीकरण गेल्या अनेक वर्षांपासून अविरत सुरूच आहे. कोणताही बडेजाव न मिरविता दिल्या जात असलेला मदतीच्या हाताने अनेक पत्रकारांना आजवर तारून नेले आहे. आर्थिक हलाखीत व अडचणीत दिवस काढून पत्रकारितेच्या माध्यमातून समाजसेवा करीत करीत असतो . आपण केवळ समाजाचे काहीतरी देणे लागतो,याच हेतूने पत्रकार हा इतरांना न्याय देण्यासाठी नाहक मोठ- मोठी भांडणे व  समाजातील मोठमोठ्या घटकांशी वैर घेत त्यांना जणू अंगावर घेत असतो,सतत इतरांसाठी धडपडणारा हा घटक कधीही जात, धर्म पाहत नाही. आपलं घर वा-यावर सोडून प्रत्येकाच्या कुटुंबातला सदस्य असल्यासारखा अडचणीत सर्वांना मदत करतो. मात्र संकटात धावणारा आपला बांधव केवळ कौतुकाची बातमी देण्यापुर्ताच आहे काय ? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही परंतु प्रा.नंदलाल पवार यांच्या रूपाने मदत करणारा आपल्यातला पुढारी पत्रकारांना लाभला आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या