💥परभणी जिल्ह्यातील ग्राहकांनी मद्यविक्री अनुज्ञप्तीच्या ठिकाणी गर्दी करू नये - जिल्हाधिकारी श्री. मुगळीकर


💥गर्दी करतांना आढळून आल्यास नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्याचे संकेत💥

परभणी, दि.19 :-  जिल्ह्यामध्ये फक्त विदेशी मद्याची घरपोच सेवा सुरु करण्यात आलेली आहे . गुगल लिंकवर मद्याची नोंदणी केलेल्या ग्राहकांना व व्हॉटस अप, लघुसंदेश, भ्रमणध्वनी व दुरध्वनीद्वारे मद्याची नोंदणी केलेल्या ग्राहकांना घरपोच विदेशी मद्यसेवा पुरविण्यात येणार आहे. तरी ग्राहकांनी मद्यविक्री अनुज्ञप्तीच्या ठिकाणी गर्दी करु नये, तसे आढळून आल्यास नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. अशा सुचना जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी दिल्या आहेत.
          कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी परभणी जिल्ह्यात मद्य खरेदीसाठी होणाऱ्या गर्दीचे नियमन होण्यासाठी मद्य खरेदी करु इच्छिणाऱ्या  नागरिकांची गुगल लिंकवर मागणी नोंदविण्यात आलेली आहे . तसेच मद्याची मागणी नोंदविण्यासाठी परवानाधारक ग्राहक व्हॉटस अप, लघुसंदेश, भ्रमणध्वनी व  दुरध्वनीचा वापर करुन शकतील. मद्यविक्री अनुज्ञप्तीधारकाचे व्हॉटस अप, लघुसंदेश, भ्रमणध्वनी व दुरध्वनी क्रमांक हे https://parbhani.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येतील. असेही जिल्हाधिकारी, परभणी यांनी कळविले आहे.
               -*-*-*-*-

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या